शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

युवकांनी समाजऋण फेडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:40 IST

ज्या समाजात आपण जन्मलो व लहानाचे मोठे झालो. त्या समाजाला काहीतरी देणे लागते. त्यामुळे समाजऋण फेडण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.

ठळक मुद्देनामदेव उसेंडी यांचे प्रतिपादन : कबड्डी स्पर्धेत ४७ संघाचा सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्कमालेवाडा : ज्या समाजात आपण जन्मलो व लहानाचे मोठे झालो. त्या समाजाला काहीतरी देणे लागते. त्यामुळे समाजऋण फेडण्यासाठी युवकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी यांनी केले.रानवाही टोला येथे प्रौढांच्या कबड्डी व व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. सदर कबड्डी स्पर्धेत जिल्ह्यातील एकूण ४७ तर व्हॉलिबॉल स्पर्धेत १८ संघांनी सहभाग घेतला. कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक कुकडेल, द्वितीय क्रमांक बोडेना तर तृतीय क्रमांक रानवाही येथील कबड्डी संघाने पटकाविला. व्हॉलिबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक येंगलखेडा तर द्वितीय क्रमांक मोहझरीच्या संघाने मिळविला. उद्घाटनीय कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून माजी जि.प. सदस्य नंदू नरोटे, पं.स. सभापती गिरीधर तितराम, जि.प. सदस्य गीता कुमरे, प्रभाकर तुलावी, जयंत हरडे, पं.स. सदस्य मोहन पुराम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अंकरशहा मडावी यांनी केले तर आभार काशीनाथ कुमोटी यांनी मानले.कार्यक्रमाला मुख्याध्यापक सुनील कुमरे, रानवाहीचे सरपंच राकेश कोल्हे, माजी सरपंच चंद्रशहा कोडाप, उद्ध्व सयाम, देवराव सयाम, बाळकृष्ण उईके, विश्वनाथ कुमरे, उमाकांत मडावी आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमात जयसेवा स्मृती पुरस्कार देऊन कबड्डी व व्हॉलिबॉल स्पर्धेतील विजेत्यांना संघांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी इतर मान्यवरांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. सदर व्हॉलिबॉल व कबड्डी स्पर्धा पाहण्यासाठी मालेवाडा परिसरातील क्रीडाप्रेमींची गर्दी झाली होती. दरवर्षी रानवाही टोला येथे कबड्डी व व्हॉलिबॉल स्पर्धेचे आयोजन होते.