शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

युवाशक्ती संघटनेच्या नगरसेवकाचा भाजपात प्रवेश

By admin | Updated: July 16, 2016 01:42 IST

पूर्वाश्रमीच्या युवाशक्ती संघटनेकडून गडचिरोली पालिकेत विसापूर वॉर्डाचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले नगरपालिकेचे ...

न. प. निवडणुकीच्या तोंडावर : संजय मेश्राम झाले भाजपवासी गडचिरोली : पूर्वाश्रमीच्या युवाशक्ती संघटनेकडून गडचिरोली पालिकेत विसापूर वॉर्डाचे नगरसेवक म्हणून निवडून आलेले नगरपालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती संजय मेश्राम यांनी पालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीत खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी यांच्या उपस्थितीत खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी प्रवेश केला. यावेळी भाजपच्या किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष रमेश भुरसे, गडचिरोली शहर अध्यक्ष सुधाकर येनगंधलवार, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश विश्रोजवार, जनार्धन साखरे, शहर महामंत्री विनोद देवोजवार, राकेश राचमलवार, हर्षद राहुलकर, जीवन गोडे, बापू करमे, दत्तम करमे, गणेश नेते, मनोज आखाडे आदींसह भाजपचे बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी खा. अशोक नेते यांनी नगरसेवक संजय मेश्राम यांचे पुष्पगुच्छ देऊन पक्षात स्वागत केले. युवाशक्ती संघटनेने गडचिरोली नगर पालिकेवर सत्ता काबीज केल्यानंतर प्रथम भूपेश कुळमेथे यांच्या गळात नगराध्यक्ष पदाची माळ पडली. त्यांच्या कार्यकाळात नगरसेवक संजय मेश्राम यांच्याकडे पाणीपुरवठा सभापती पदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. अडीच वर्षांची सभापतीपदाची कारकिर्द त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. नगरसेवक मेश्राम यांचा विसापूर वॉर्ड व कॉम्प्लेक्स भागात चांगला जनसंपर्क आहे. आता त्यांच्या पाठोपाठ विसापूर प्रभागातील अनेक कार्यकर्ते भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)