शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

युवांनी जाणली काश्मिरची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 23:38 IST

सीआरपीएफ व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी बहूल व नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दहावे आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत सहलीचे आयोजन करण्यात आले.

ठळक मुद्देअहेरीत सहलीचा समारोप : सीआरपीएफ व नेहरू युवा केंद्राचा पुढाकार

आॅनलाईन लोकमतअहेरी : सीआरपीएफ व नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी बहूल व नक्षलग्रस्त भामरागड तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी दहावे आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमांतर्गत सहलीचे आयोजन करण्यात आले. २३ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत या विद्यार्थ्यांची सहल जम्मू काश्मिर येथे नेण्यात आली. या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध माहिती जाणून घेतली.आदिवासी बहूल व नक्षलग्रस्त भागातील युवा वर्गाला देशातील कला, संस्कृती व क्षेत्राबाबत माहिती व्हावी, भाषा, चालीरिती, बोलीभाषा याबाबत ज्ञान व्हावे व त्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा या हेतूने सीआरपीएफ व नेहरू युवा केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आदान-प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत भामरागड तालुक्यासह जिल्ह्यातून एकूण ३९ युवक- युवती सहलीत सहभागी झाल्या. सहलीदरम्यान विविध माहिती जाणल्यानंतर परत आलेल्या विद्यार्थ्यांसाठी अहेरीत समारोपीय कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला ३७ बटालीयनचे कमांडंट श्रीराम मीना, द्वितीय कमान अधिकारी पी. एस. धपोला, बी. के. शर्मा, उपकमांडंट राकेश कुमार, संजय कुमार पुनिया, प्रदीप राणा, बी. सी. रॉय, सहायक कमांडंट राजकुमार व सीआरपीएफचे अधिकारी, जवान उपस्थित होते.दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील युवक- युवतींनी जीवनात उत्तम मार्ग पत्करून आपल्या भविष्यासह समाजाचा विकास करण्याच्या हेतूने काम करावे, असे आवाहन कमांडंट श्रीराम मीना यांनी केले. यावेळी युवक- युवती उपस्थित होते.