भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली येथे आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन भाजपचे अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा खासदार अशोक नेते यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी प्रमुख् पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष नागदेवे, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष वामन तुरके, नगराध्यक्ष योगीता पिपरे, जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लालवार, आदिवासी मोर्चाचे प्रदेश महामंत्री प्रकाश गेडाम आदी उपस्थित हाेते.
आत्मनिर्भर भारत या योजनेद्वारे युवकांना प्रशिक्षित करून त्यांना लघुउद्योग उभारण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी तथा त्यांना स्वयंरोजगार उभारून राष्ट्रविकासास हातभार लागावा या उदात्त हेतूने सदर योजना राबविण्यात येत आहे. याद्वारे विभिन्न प्रशिक्षण देऊन युवक-युवतींना आत्मनिर्भर बनविण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने २१ लाख ९७ हजार कोटींचा निधी आत्मनिर्भर भारत योजनेकरिता दिला आहे.
जंगल, डोंगराळ भागात औषधी वनस्पतीची लागवड व व्यापाराकरिता १ हजार कोटींची तरतूद आत्मनिर्भर भारत याेजनेमध्ये आहे. यात प्रशिक्षणाची व्यवस्था आहे. यांत्रिकीकरणाकरिता ही मदत आहे. मधमाश्या पाळणे, मध गोळा करणे याकरिता आत्मनिर्भर भारतमध्ये ५ हजार कोटींची तरतूद आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून मच्छिपालनकरिता ५० हजार कोटींची तरतूद आहे. बांबू क्षेत्राकरिताही तरतूद आहे. महिला व बचत गटाकरिताही भरीव तरतूद आहे
भाजप व भाजपतील इतर मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी गरजूंना लाभ मिळवून देण्याचे कार्य या कार्यालयाच्या माध्यमातून व्हावे, असे आवाहन केले.
यावेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, प्रदेश सदस्य रमेश भुरसे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओलालवार, गोविंद सारडा, प्रमोद पिपरे, जि.प.समाज कल्याण रंजिता कोडापे, चांगदेव फाये, स्वप्निल वरघंटे, शंभुविधी गेडाम, मुक्तेश्वर काटवे, सागर कुमरे, साहिल कोडापे आदी उपस्थित होते.