शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाने केली प्रेयसीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST

विहीरीत पडलेल्या प्राचीच्या कमरेला सिमेंटच्या पोत्यांमध्ये भरून दगड बांधले होते. त्यावरून वडिलांनी तिची हत्या करून विहिरीत फेकल्याचा आरोप केला. परंतू पोलिसांनी तिला धक्का देऊन विहीरीत ढकलले असे सांगितले. एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात रात्री आणल्यानंतर शनिवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले.

ठळक मुद्देआरोपी प्रियकर फरार । कमरेला दगड बांधून ढकलले शेतातील विहिरीत

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : ज्याच्या जीवात जीव अडकला, प्रेमाच्या आणाभाका घेऊन ज्याच्यावर विश्वास टाकला त्या प्रियकरानेच आपल्या प्रेयसीला विहिरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रकार उघडकीस आला. ही घटना एटापल्लीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या बोलेपल्ली पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील पिलीगुडम गावालगत घडली. जयदेव निरंजन सरदार (२२) असे आरोपीचे नाव असून तो फरार झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एटापल्ली पोलीस उपविभागांतर्गत पिलीगुडमपासून २५ किमी अंतरावर असलेल्या कोपरअल्ली (ता.मुलचेरा) या गावातील जयदेव निरंजन सरदार (२२) आणि पवन दयाल जुलमे (२२) या दोन युवकांचे पिलीगुडम येथील प्राची बारसागडे (१८) आणि छकुली (१९) या दोन युवतींसोबत प्रेमसंबंध होते. त्या चौघांमध्ये खास मैत्री होती. गुरूवारी (दि.११) सकाळी दोघीही मैत्रिणी आई-वडील घरी नसताना घरून निघून गेल्या. सायंकाळी आई-वडील घरी आल्यानंतर त्यांनी मुलींचा शोध घेतला पण मुली मिळाल्या नाही.प्राचीच्या वडीलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्र ार बोलेपल्ली पोलीस मदत केंद्रात शुक्र वारी सकाळी दिली. त्याचवेळी तिचा प्रियकर असलेल्या युवकावर शंकाही घेतली. पोलिसांच्या सूचनेनुसार प्राचीच्या आई-वडीलांनी दोन्ही युवकांच्या कोपरअल्ली गावात जाऊन चौकशी केली असता प्राचीची मैत्रिण छकुली आणि तिचा प्रियकर पवन गावातच होते. परंतु जयदेव गावात नव्हता. गावकऱ्यांनी त्यांच्यावर दबाव टाकून विचारले असता प्राची ही पिलीगुडम गावापासून १ किमी अंतरावरील शेतातल्या विहीरीत पडून असल्याची माहिती त्यांनी दिली. गावकऱ्यांनी परत येऊन बोलेपल्ली पोलीस मदत केंद्राला दिली. पोलिसांच्या सूचनेनुसार गावकरी व प्राचीच्या वडीलांनी विहिरीतील तिचा मृतदेह बाहेर काढला.विहीरीत पडलेल्या प्राचीच्या कमरेला सिमेंटच्या पोत्यांमध्ये भरून दगड बांधले होते. त्यावरून वडिलांनी तिची हत्या करून विहिरीत फेकल्याचा आरोप केला. परंतू पोलिसांनी तिला धक्का देऊन विहीरीत ढकलले असे सांगितले. एटापल्ली ग्रामीण रुग्णालयात रात्री आणल्यानंतर शनिवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले.हत्येनंतर मैत्रिणीने मंदिरात केला विवाहप्राचीला विहीरीत ढकलल्यानंतर तिची मैत्रिण छकुली आणि तिचा प्रियकर पवन जुलमे यांनी बोलेपल्लीजवळील एका शिवमंदिरात आरोपी जयदेवच्या उपस्थितीत विवाह केला, अशी कबुली पोलीस मदत केंद्रात दिली. त्यामुळे या घटनेचे गूढ आणखी वाढले असून प्राचीची हत्या तिच्या प्रियकराने नेमक्या कोणत्या कारणातून केली हे प्रियकराच्या शोधानंतरच उघडकीस येणार आहे. दरम्यान या घटनेशी संबंधित छकुली व पवन यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यांच्याच बयानावरून प्राचीचा प्रियकर जयदेव याच्यावर भादंवि कलम ३०२ चा गुन्हा दाखल केला, मात्र तो फरार आहे.घटनेच्या वेळी प्राची आणि जयदेव यांच्यात भांडण झाले असावे. या भांडणातून जयदेवने प्राचीला विहिरीत धक्का देऊन पाडले अशी शक्यता आहे. हत्येचा गुन्हा दाखल झाला असून जयदेवचा शोध सुरू आहे. छकुली व पवनला बोलावून त्यांचीही चौकशी सुरू आहे.- एस.एस.चव्हाण,ठाणेदार, पोलीस मदत केंद्र, बोलेपल्ली 

टॅग्स :Murderखून