शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
4
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
5
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
6
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
7
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
9
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
10
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
11
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
12
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
13
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
14
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
15
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
16
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
17
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
19
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
20
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?

हवी ती मिळेल, तुम्ही फक्त ब्रॅन्ड सांगा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 22:12 IST

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी प्रत्यक्षात दारू सर्वत्र मिळते हे सत्य नाकारता येत नाही. गडचिरोली शहरात तरी दारू मिळत नाही असा दावा कोणी करण्याची हिंमत करू शकत नाही. शहरवासीय दारू किती प्रमाणात आणि कोणकोणत्या प्रकारची दारू पितात याची एक झलक पहायची असेल तर आरमोरी मार्गावरील नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राला एकदा अवश्य भेट द्या. त्या ठिकाणी शहरवासीयांनी ढोसलेल्या विविध प्रकारच्या दारूच्या बाटल्यांचा भलामोठा ढीग दारूबंदीचा कसा फज्जा उडतो याची साक्ष देत उभा आहे.

ठळक मुद्देकचऱ्यातून सत्य उघड : गडचिरोलीवासीयांची पसंत जीन, बीअर, व्हिस्की अन् व्होडकाही

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी प्रत्यक्षात दारू सर्वत्र मिळते हे सत्य नाकारता येत नाही. गडचिरोली शहरात तरी दारू मिळत नाही असा दावा कोणी करण्याची हिंमत करू शकत नाही. शहरवासीय दारू किती प्रमाणात आणि कोणकोणत्या प्रकारची दारू पितात याची एक झलक पहायची असेल तर आरमोरी मार्गावरील नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राला एकदा अवश्य भेट द्या. त्या ठिकाणी शहरवासीयांनी ढोसलेल्या विविध प्रकारच्या दारूच्या बाटल्यांचा भलामोठा ढीग दारूबंदीचा कसा फज्जा उडतो याची साक्ष देत उभा आहे.अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी आहे. ज्यावेळी दारूबंदी झाली त्यावेळी नियमित मद्यसेवन करणाºयांची मोठी फजिती झाली असणार. पण त्यांच्या पुढच्या पिढीचा तर दारूशी संबंधच तुटणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात तसे झाले नाही. दारूचे दुकान आणि बार नसतानासुद्धा पुढच्या पिढीपर्यंत दारूच्या विविध प्रकारांसह सर्व माहितीचे अद्यावत ‘ज्ञान’ अगदी ‘प्रॅक्टीकल’सह पोहोचत आहे. त्यामुळे केवळ दारूच्या ब्रॅन्डचीच माहिती नाही तर कोणत्या दारूची बॉटल गडचिरोलीत किती रुपयांना मिळते, कुठे मिळते हेसुद्धा ते सहजपणे सांगू शकतात. या ज्ञानात आणि प्रॅक्टीकली ते अनुभवण्यात गडचिरोली शहरवासीय किती परफेक्ट आहेत याचा प्रत्यय नगर परिषदेच्या कचरा व्यवस्थापन प्रकल्पातील दारूच्या बाटल्यांचा ढिगारा पाहून येतो.शहरातील कचराकुंड्या, कंटेनरमध्ये गोळा होणारा कचरा, एवढेच नाही तर नाल्यांमधून काढल्या जाणारा गाळ घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावर नेऊन तिथे कचऱ्याचे विलगीकरण केले जाते. या कचºयातून काचेच्या बाटल्या, प्लास्टिकच्या वस्तू वेगळ्या काढल्या जातात. या कचऱ्यातून आलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये रिकाम्या औषधीच्या बाटल्या क्वचितच नजरेस पडतात, पण विविध ब्रॅन्डच्या दारूच्या रिकाम्या बाटल्यांनी मात्र नजर दिपून जाते.‘गडचिरोलीवासियांना दारूची चव काय’ असा बाहेरून या जिल्ह्यात येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचा सर्वसाधारण गैरसमज असतो. पण विस्कीतील काही मोजके ब्रॅन्डच नाही तर फ्रिजमध्ये ठेवाव्या लागणाऱ्या बिअरसह, वाईन, जीन, वोडका अशा सर्वच प्रकारातील दारूचा गडचिरोलीवासीय मोठ्या आनंदाने आणि बिनबोभाटपणे आस्वाद घेत असल्याचे त्या ढिगाºयाकडे पाहिल्यानंतर स्पष्टपणे दिसून येते. एवढ्या प्रमाणात आणि इतके वेगवेगळे ब्रॅन्ड गडचिरोलीत मिळतात? असा प्रश्न एका जाणकाराला केल्यावर तो म्हणाला, ‘आश्चर्य वाटून घेऊ नका, हवी ती मिळेल, तुम्ही फक्त ब्रॅन्ड सांगा!’