शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला कर्जमाफी, शेतमालाला भाव नको का?

By admin | Updated: June 4, 2017 00:38 IST

कधी नव्हे ते पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले आहेत.

मनोज ताजने । लोकमत न्यूज नेटवर्ककधी नव्हे ते पहिल्यांदा संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या तीन दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरले आहेत. यामुळे राज्य सरकारही हादरून गेले आणि शेतकऱ्यांच्या संपानंतर दोन दिवसांतच सरकारने अल्पभूधारक शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. या घोषणेमुळे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी संपातून माघार घेतली असली तरी अनेक ठिकाणी ‘संपूर्ण कर्जमाफी द्या आणि घोषणा न करता प्रत्यक्ष कृती करा,’ असे म्हणत आंदोलनाची धग कायम ठेवली आहे. मात्र राज्यातील शेतकऱ्यांचे आंदोलन एकीकडे आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी दुसरीकडे, असा विरोधाभास पहायला मिळत आहे. हा विरोधाभास कोड्यात टाकणाराच नाही तर अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे.जे शेतकरी या आंदोलनात उतरले आहे ते केवळ स्वत:चा फायदा करून घेण्यासाठी नाही, तर संपूर्ण राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी ते लढत आहेत. घाम गाळून पिकविलेला शेतमाल असो की अमृतासमान दूध असो, ते रस्त्यावर फेकून आपला संताप व्यक्त करताना त्यांना कोणताही आनंद मिळत नाही. पण सरळ मार्गाने केलेल्या आपल्या मागण्यांची दखल सरकार घेत नाही हे लक्षात आल्यानेच शेतकऱ्यांना हे पाऊल उचलावे लागले. अनेक शेतकरी उत्स्फूर्तपणे यात सहभागी झाले. या आंदोलनाचा जो काही लाभ मिळणार तो फक्त आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनाच मिळणार नाही तर तो राज्यातल्या संपूर्ण शेतकऱ्यांना मिळणार आहे. मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत तमाम शेतकऱ्यांच्या व्यथा कमी-जास्त प्रमाणात सारख्यात आहेत. पण तरीही गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी जणूकाही त्या आंदोलनाशी आपला काहीही संंबंध नाही अशा अविर्भावात आहेत. त्यांचे सर्व व्यवहार ‘आॅल ईज वेल’ सुरू आहेत. याचा अर्थ गडचिरोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ नको का? त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव नको का? आम्ही आंदोलन केले नाही, आम्हाला त्याला लाभही नको, असे कोणी शेतकरी म्हणणार आहे का? अर्थातच नाही. मिळणारा लाभ कोणीही सोडणार नाही. पण त्यासाठी रस्त्यावर उतरण्यास कोणीही तयार नाही.धान उत्पादकांच्या या जिल्ह्यात शेतकरी खूप जास्त कर्ज घेत नाही. त्यामुळे कर्जबाजारी होऊन आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याचे प्रमाणही या जिल्ह्यात कमी आहे. याचा अर्थ स्थानिक शेतकऱ्यांना कोणतीच झळ पोहोचत नाही असे अजिबात नाही. उत्पादन खर्चापेक्षा दीड पट अधिक भाव देऊ, असे आश्वासन देऊन सत्तेत येणाऱ्यांनी दीड पट सोडा, तीन वर्षात धानाचे हमीभाव अत्यल्प वाढवून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. इतर शेतमालाचीही तीच गत आहे. तरीही या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रक्त अजून खवळलेले नाही.शेतकऱ्यांच्या या आंदोलनात सुदैवाने कोणतेही राजकीय पक्ष प्रत्यक्षपणे उतरले नाहीत. अप्रत्यक्षपणे काही ठिकाणी विरोधी पक्षवाल्यांनी निश्चितच आंदोलनाला पाठबळ दिला असेल. मात्र गडचिरोलीत तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कोणत्याही प्रकारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे नेतृत्व करण्यास कोणी पुढाकार घेताना दिसत नाही. यावरून या जिल्ह्यात विरोधी पक्ष किती निष्क्रिय आहे हे दिसून येते. आम्ही कर्जमाफी दिली होती, आता तुम्हीही द्या, असे म्हणत विरोधक खुलेआमपणे या रस्त्यावर उतरून आंदोलन पेटवू शकले असते. शेतकरी संघटना तर जिल्ह्यात केव्हाच संपली आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकरी दिशाहीन झाले आहेत. राज्याच्या शेवटच्या टोकावरील या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. आज कधी नव्हे ते शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. कोणत्याही कर्मचारी संघटनांच्या आंदोलनापेक्षा राज्यातील हे शेतकऱ्यांचे आंदोलन मोठे आहे. त्यामुळेच त्याचे परिणाम तातडीने दिसत आहे. उद्या या आंदोलनाचा जो काही फायदा होईल त्यात आपलाही खारीचा वाटा आहे, असे अभिमानाने सांगता यावे याची काळजी या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे.