शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

यंदा रोहयोतून शेताच्या बांधावर होणार वृक्षलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:16 IST

राज्यातील विशिष्ट प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेतजमिनींवर आणि बांधांवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यास सरकारने मान्यता दिली आहे.

ठळक मुद्देशासनाने घेतला निर्णय : जॉबकार्डधारकांना मिळणार लाभ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राज्यातील विशिष्ट प्रवर्गातील शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेतजमिनींवर आणि बांधांवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम राबविण्यास सरकारने मान्यता दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आला असून वन विभागाच्या सामाजिक वनीकरण शाखेमार्फत या निर्णयाची अंमलबजावणी होईल, असे रोजगार हमी योजनेच्या राज्य आयुक्तलयातून सांगण्यात आले.या संदर्भातील शासन निर्णयात नमूद केल्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, निराधिसूचित जमाती (विमुक्त जाती), दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, स्त्री -कर्ता असेलेली कुटुंबे, शारीरिकदृष्ट्या विकलांग असलेली व्यक्ती कर्ता असलेली कुटुंबे, जमीन सुधारणांचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी अधिनियम २००६ चे लाभार्थी यांना या योजनेचा लाभ दिला जाईल आणि या प्रवर्गातील पात्र लाभार्थींना प्राधान्य देण्यात आल्यानंतर २००८ च्या कृषी कर्जमाफी व कर्ज सहाय योजनेत व्याख्या केलेल्या लहान तसेच सीमांत भूधारक शेतकºयांच्या जमिनीवरील कामांच्या व शर्तीच्या अधीन राहून या योजनेत प्राधान्य दिले जाईल.या योजनेच्या मार्गदर्शक सूचना, लाभ धारकाची निवड आणि त्यांची अर्हता या योजनेतील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीवर आणि बांधावर लागवड करावयाच्या वृक्षांची यादी हा तपशील १२ एप्रिल २०१८ रोजी जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयात नमूद करण्यात आला आहे. या योजनेत वृक्ष लागवडीचा कालावधी १ जून ते २० नोव्हेंबर असा राहणार आहे. योजनेतील लाभार्थी हे जॉबकार्डधारक असणे आवश्यक असल्याने त्यांना केलेल्या वृक्ष लागवडीचे संवर्धन व जोपासना करण्याची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. वृक्ष लागवडीसाठी शासनाने पावले उचलली आहे.७५ टक्के झाडे जगल्यास मिळणार अनुदानवृक्षनिहाय मापदंडानुसार दुसऱ्या व तिसऱ्या वर्षातील जीवंत झाडांच्या टक्केवारीप्रमाणे कामे करण्याची जबाबदारी लाभार्थ्यांची राहणार आहे. दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी बागायत वृक्ष लागवडीच्या क्षेत्रात किमान ९० टक्के आणि कोरडवाहू वृक्षांच्या बाबतीत ७५ टक्के झाडे जिवंत ठेवतील असेच लाभार्थी अनुदानास पात्र राहणार आहेत.