शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

यंदा पीक कर्जाचे लक्ष्यांक वाढले

By admin | Updated: May 30, 2014 00:04 IST

कृषी विभागाने खरीप व रबी हंगामातील लागवडीसाठी शेतकर्‍यांना कर्जाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यावर्षी २0१४-१५ या वर्षात सर्व बँकांना मिळून एकूण १२४ कोटी रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.

दिलीप दहेलकर - गडचिरोलीकृषी विभागाने खरीप व रबी हंगामातील लागवडीसाठी शेतकर्‍यांना कर्जाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी यावर्षी २0१४-१५ या वर्षात सर्व बँकांना मिळून एकूण १२४ कोटी रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.  गत दोन-तीन वर्षाच्या तुलनेत यावर्षी पीक कर्जाच्या वाटपाच्या उद्दिष्टात वाढ झाली असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांना खरीप हंगामासाठी ५ हजार २७३ लाख व रबी हंगामासाठी ५00 लाख असे एकूण ५ हजार ७७३ लाख रूपये कर्ज वाटपाचे लक्षांक देण्यात आले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस यंदाच्या खरीप हंगामासाठी ४ हजार ४४२ व रबी हंगामासाठी ७६0 लाख असे एकूण ५ हजार २0२ लाख रूपये कर्ज वाटपाचे लक्षांक देण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण बँकांना खरीप हंगामासाठी १ हजार २६५ लाख तर रबी हंगामासाठी १६५ लाख असे एकूण १ हजार ४३0 लाख रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.आदिवासीबहुल, मागास व उद्योगविरहीत गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय शेती हा आहे. जिल्ह्यातील नागरिकांचे वर्षभराचे आर्थिक बजेट शेती उत्पादनावर अवलंबून असते. यामुळे जिल्ह्यातील कृषी विकासाच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी जिल्ह्याचा कृषी विभाग प्रयत्नशील आहे. यामुळे यंदा जिल्हा प्रशासन व कृषी विभागाने पीक कर्जाच्या उद्दिष्टात वाढ केली असून बँकांना शेतकर्‍यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सुचनाही केल्या आहेत.गतवर्षी २0१३-१४ च्या खरीप हंगामासाठी राष्ट्रीयकृत, मध्यवर्ती सहकारी व ग्रामीण बँकांना मिळून ९ हजार ९८0 लाख रूपयाचे पीक कर्ज वितरित केले. रबी हंगामासाठी या सर्व बँका मिळून गतवर्षी १ हजार २९७ लाख रूपयाचे कर्ज वितरित केले. जिल्ह्यातील २९ हजार २८४ क्रेडिटधारक शेतकर्‍यांनी पीक कर्जाचा लाभ घेतला आहे. जिल्ह्यात वनपट्टे वाटप झाल्यामुळे शेतकर्‍यांची संख्याही वाढली आहे. त्या तुलनेत कर्ज वितरणाचे प्रमाण अद्यापही कमीच आहे. होत असलेल्या कर्ज वाटपातून या शेतकर्‍यांनी खरीप व रबी पिकाची लागवड करून गेल्या काही वर्षात उत्पादन घेतले आहे. पीककर्ज उपलब्ध होऊन सहकारातून कृषी विकास काही प्रमाणात होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)