शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर निम्मे होतील टोलचे दर, 'अशा' रस्त्यांवर वाहन चालवणाऱ्यांना दिलासा; सरकारनं बनवला नवा प्लॅन
2
धक्कादायक! हरवलेला क्रिकेटचा बॉल शोधत होता, बंद घरात मानवी सांगाडा पाहून हादरला
3
Video : पॅराग्लायडिंग करण्यासाठी 'तो' धावत गेला अन् दरीत कोसळला! व्हिडीओ बघून चुकेल काळजाचा ठोका
4
मुंबई: घरातील सगळे झोपले अन् वाहतूक पोलीस अधिकाऱ्याने आयुष्य संपवले, साडीनेच घेतला...
5
BSE Bomb Threat: "बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत दुपारी ३ वाजता बॉम्ब स्फोट होणार" धमकीचा ईमेल!
6
संतापजनक! ६ मुलं तरी मुखाग्नीसाठी ६ तास थांबले, अंत्यसंस्कारावेळी संपत्तीवरुन स्मशानभूमीत भिडले
7
हत्या की अपघात? रस्त्यावर स्कूटी, शेतात चप्पल... बेपत्ता बँक मॅनेजरचा विहिरीत सापडला मृतदेह
8
जम्मू-काश्मीरमधील दोडामध्ये भीषण अपघात, प्रवाशांनी भरलेले वाहन दरीत कोसळले; सात जणांचा मृत्यू
9
Bread Gulabjam: उरलेल्या ब्रेडच्या स्लाईजपासून १० मिनिटात करा मऊ रसरशीत गुलाबजाम! 
10
"मी एक मोठा सिनेमा करतोय...भाऊ कदम अन् 'हा' अभिनेता दिसणार"; निलेश साबळेचा खुलासा
11
टाटाचा 'हा' स्टॉक ५२ आठवड्यांच्या उच्चांकावर! गुंतवणूकदार मालामाल, तुम्ही खरेदी केलाय का?
12
'तिला न्याय देण्याऐवजी भाजपच्या व्यवस्थेने आरोपींना वाचवले'; राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
13
कुतुहलापोटी रेल्वे इंजिन बघायला वर चढला, पण हाय पॉवर केबलचा करंट जीवावर बेतला; १६ वर्षीय मुलाचा मृत्यू
14
दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...
15
१३८ दिवस शनि वक्री: ५ राशींवर शनिची वक्र दृष्टी कायम, ‘हे’ रामबाण उपाय कराच; शनि शुभ करेल!
16
"तो लहान मुलगा म्हणाला मी उंदीर खाल्ला...", 'लग्नानंतर होईलच प्रेम' फेम अभिनेत्रीने सांगितला अंगावर शहारे आणणारा अनुभव
17
DMR Stock Price: ५ वर ८ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरची किंमत २०० रुपयांपेक्षाही कमी, स्टॉकमध्ये १४ टक्क्यांपेक्षाही अधिक तेजी
18
टेस्लाची पहिली कार मॉडल Y लाँच, किंमत २३ लाख नाही, तुमचा आमचा श्वास रोखणारी... EMI किती?
19
सोने सांभाळण्याची भीती वाटते? ऑनलाईन पर्यायातून मिळेल जास्त नफा, कशी करायची गुंतवणूक?
20
अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?

यंदा आम्ररसाची गोडी अविट राहणार!

By admin | Updated: February 16, 2015 01:26 IST

मागील अनेक वर्षांतील रेकॉर्ड मोडीत काढीत आंब्यांच्या झाडांना मोहोर आला आहे. आंब्याच्या झाडांची फांदी न् फांदी बहरली आहे.

वैरागड : मागील अनेक वर्षांतील रेकॉर्ड मोडीत काढीत आंब्यांच्या झाडांना मोहोर आला आहे. आंब्याच्या झाडांची फांदी न् फांदी बहरली आहे. सध्या ज्या पध्दतीने आंब्याना मोहोर आला आहे. त्यातील एक पाव हिस्सा इतकाच बहर फळात रूपांतर होईपर्यंत कायम राहिल्यास व निसर्गाची अवकृपा न झाल्यास यावर्षात गावठी आंब्याच्या रसाची गोडी अविट राहणार आहे. वैरागड परिसरात असलेल्या शेतशिवारातील तसेच आमराईतील आंब्याना बऱ्यापैकी मोहोर आलेला आहे. यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात निसर्गाने साथ दिल्यास साऱ्यानाच गावठी आंब्याची चव चाखायला मिळणार आहे. मात्र अस्मानी संकट असले की आंबे असेच बहरून येतात, असे जुने जाणकार सांगतात. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आमराया अस्तित्वात होत्या. गावात आमराई नाही, असा गाव शोधूनही सापडणार नाही. मात्र आता गावात आमराई सापडणार नाही. पूर्वीच्या काळात गावागावांत गावठी आंब्याच्या मोठमोठ्या आमराया होत्या. बाहेर गावावरून मामाच्या गावाला जाणारे शाळकरी मुले या आमराईत जावून मनमुरादपणे खेळायचे बागळायचे तसेच दगडाने वार करून आंबे पाडायचे. परिश्रमाने आणलेल्या आंब्याची चवही त्या काळात अधिकच गोड होती. मात्र आता विकतच घ्यावे लागते.काही गावातील पिढीजात आमराया काळाच्या ओघात नष्ट झाल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी अल्प आर्थिक मोबदल्यासाठी स्व मालकीच्या जागेतील आंब्याची झाडे कंत्राटदारांना विकली तर काहींनी विटा भाजण्यासाठी आंब्याच्या झाडांच्या लाकडाचा उपयोग केला. त्यामुळे गाव खेड्यातील आमराया शेवटच्या घटका मोजत आहेत. गावातील आमरायाचा नष्ट झाल्या. त्यासोबतच आमरायातील पाखरांची चिवचिवाटही लोप पावत असल्याचे दिसून येते.