लोकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील युवकांमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी भीती आहे. अनेक युवकांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, याबाबतही माहिती नाही. लोकमतने सुरू केलेल्या ‘स्पर्धेच्या जगात’ या सदरात अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती दिली जात आहे. हे सदर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºया युवकांसाठी दिशादर्शक ठरेल, असे प्रतिपादन चामोर्शीचे तहसीलदार अरूण येरचे यांनी केले.चामोर्शी येथील कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात लोकमतने सुरू केलेल्या ‘स्पर्धेच्या जगात’ या सदराचे विमोचन शनिवारी करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री होते. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक आनंद मुदलीयार, पोलीस उपनिरीक्षक मल्हार थोरात, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहुल नैताम, प्रा.संजय मस्के, प्रा. डॉ. राजेंद्र झाडे, प्रा. रमेश बावणे उपस्थित होते.मार्गदर्शन करताना तहसीलदार अरूण येरचे पुढे म्हणाले, स्पर्धा परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी परिश्रमासोबत योग्य मार्गदर्शनाचीही गरज भासते. लोकमतचे ‘स्पर्धेच्या जगात’ हे सदर विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. या सदराचा पुरेपूर उपयोग विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयार करताना करावा, असे मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक आनंद मुदलीयार यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, अभ्यास कसा करावा, परीक्षेला सामोरे कसे जावे, याबाबतचे स्वअनुभव कथन केले. प्राचार्य डॉ. डी. जी. म्हशाखेत्री यांनी लोकमतने स्वतंत्र अॅप तयार करून त्यामध्ये या सदरातील महत्त्वपूर्ण माहिती टाकावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहुल नैताम यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विमोचनानंतर विद्यार्थ्यांनी ‘स्पर्धेच्या जगात’ या सदराचे वाचन केले. सदरातील माहिती अत्यंत उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी तर हे सदर सुरू झाल्यापासून आपण नियमितपणे या सदराचे वाचन करीत असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन प्रा. वंदना मस्के तर आभार प्रा. ब्राह्मणवाडे यांनी मानले. यशस्वीतेसाठी लोकमतचे तालुका प्रतिनिधी प्रा. रत्नाकर बोमीडवार, शहर प्रतिनिधी लोमेश बुरांडे, प्रा. भूषण आंबेकर, प्रा. शीतल बोमकंटीवार, प्रा. वर्षा चल्लावार, प्रा. जयश्री कुनघाडकर, प्रा. मीनल गाझलवार, प्रा. वैशाली कावळे, प्रा. भोयर, प्रा. काजल कळस्कर, प्रा. अमोल रंगारी यांच्यासह कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
‘स्पर्धेच्या जगात’ सदर युवकांसाठी दिशादर्शक ठरेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 00:37 IST
गडचिरोली जिल्ह्यातील युवकांमध्ये स्पर्धा परीक्षेविषयी भीती आहे. अनेक युवकांना स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, याबाबतही माहिती नाही.
‘स्पर्धेच्या जगात’ सदर युवकांसाठी दिशादर्शक ठरेल
ठळक मुद्देतहसीलदार अरूण येरचे यांचे प्रतिपादन : चामोर्शीत सदराचे विमोचन; मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी केली प्रशंसा