शहरं
Join us  
Trending Stories
1
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
2
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
3
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
4
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
5
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
6
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
7
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
8
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
9
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
10
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
11
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
12
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
13
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
14
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
15
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
16
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
17
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
18
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
19
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
20
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?

सुरजागड पहाडीवरील कामगारांचे उपोषण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 01:10 IST

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे लॉयड मेटल कंपनीच्या वतीने सुरू असलेले काम बंद करण्यात आले आहे. यामुळे विविध विभागात कार्यरत कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तब्बल ७०० ते ८०० जणांच्या रोजगारावर गदा आली आहे.

ठळक मुद्देप्रमुख मागणी : लॉयड मेटल कंपनीने काम सुरू करावे

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड येथे लॉयड मेटल कंपनीच्या वतीने सुरू असलेले काम बंद करण्यात आले आहे. यामुळे विविध विभागात कार्यरत कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. तब्बल ७०० ते ८०० जणांच्या रोजगारावर गदा आली आहे. यामुळे लॉयड मेटल कंपनीचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी ५ फेब्रुवारी मंगळवारपासून मजूरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केले आहे.मागील दोन वर्षांपासून सुरजागड येथील पहाडीवर लॉयड मेटल कंपनीच्या वतीने काम सुरू होते. मात्र मागील १५ दिवसांपासून कोणतेही कारण न देता काम बंद करण्यात आले आहे.काम सुरू करण्याच्या मागणीसाठी १ फेब्रुवारी रोजी पत्र देवून काम सुरू करण्याची विनंती केली होती. काम सुरू न केल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला होता. मात्र काम सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने मंगळवारपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.शासन, प्रशासनाने कंपनीला तातडीने काम सुरू करण्याचे निर्देश द्यावेत, लॉयड मेटल कंपनीने त्वरीत काम सुरू करावे, मजूरांना २५ दिवस काम द्यावे, कोनसरी येथे होत असलेल्या प्रकल्पात जास्तीत जास्त एटापल्ली तालुक्यातील व अहेरी उपविभागातील नागरीकांना प्राधान्य देण्यात यावे, प्रकल्पाचे काम तातडीने सुरू करावे, सुरजागड पहाडीवर काम करणाऱ्या मजुरांना कंपनीकडून विम्याचे संरक्षण देण्यात यावे, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या उपोषणात असंख्य मजूर, महिला सहभागी झाल्या आहेत.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली