शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या मजबुतीसाठी कार्यकर्त्यांची ताकद आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:45 IST

काँग्रेस पक्षाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद महत्त्वाची असल्याने कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा,....

ठळक मुद्देरामगोपाल भवानिया यांचे प्रतिपादन : काँग्रेसची संघटनात्मक निवडणूक सभा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : काँग्रेस पक्षाला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांची ताकद महत्त्वाची असल्याने कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन काँग्रेस जिल्हा निवडणूक अधिकारी रामगोपाल भवानीया यांनी केले.काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांना सुरुवात झाली आहे. याबाबतचा आढावा घेण्याबरोबरच निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी आरमोरी मार्गावरील मंगल कार्यालयात शुक्रवारी दुपारी १२ वाजता निवडणूक बैठक घेण्यात आली. या बैठकीप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बैठकीला काँग्रेसचे गडचिरोली निरीक्षक सुरेश भोयर, माजी खा. मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, रवींद्र दरेकर, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, माजी आ. पेंटारामा तलांडी, सगुणा तलांडी, पं. स. सभापती दुर्लभा बांबोळे, जि. प. सदस्य वैशाली ताटपल्लीवार, जि. प. सदस्य अ‍ॅड. राम मेश्राम, पंकज गुड्डेवार, समशेर खॉ पठाण, नगरसेवक तथा काँग्रेस गडचिरोली शहराध्यक्ष सतीश विधाते, रजनीकांत मोटघरे, नितेश राठोड, प्रकाश देवतळे, प्रभाकर वासेकर, मधुकर चितडे, माजी जि. प. उपाध्यक्ष जीवन नाट, हरीश मोटवानी, ऐजाज शेख, पांडुरंग घोटेकर, मनोहर पोरेटी, काशिनाथ भडके, चंदू वडपल्लीवार आदी उपस्थित होते.पुढे बोलताना रामगोपाल भवानीया म्हणाले, केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. त्यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. भाजपा विरोधात नागरिकांच्या मनामध्ये लाट निर्माण झाली आहे. भाजपा सरकारने लोकशाहीची हत्या करण्याचे काम केले आहे. रोजगाराचे केवळ आश्वासन युवकांना देण्यात आले. मात्र प्रत्यक्षात बेकारीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. काँग्रेस पक्षाने लोकशाही जीवंत ठेवली आहे. काँग्रेस पक्षाविषयी जनतेचा विश्वास अजूनही कमी झाला नाही. फक्त त्याला योग्य दिशा देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन रामगोपाल भवानीया यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनीसुद्धा भाजपा सरकारवर टीकेचा आसूड ओढला. संचालन काँग्रेसचे जिल्हा सचिव एजाज शेख तर आभार शहराध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते यांनी मानले.