शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
2
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार? सरन्यायाधीश गवई म्हणाले- पहलगाम विसरू शकत नाही
3
छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी
4
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
5
कर भरण्याचे टेन्शन सोडा! आता फक्त २४ रुपयांमध्ये भरा इन्कम टॅक्स, कोणी आणली खास ऑफर?
6
"4 दिवसांचं युद्ध..."; पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनीही PM शहबाज शरीफ यांच्या मोठ-मोठ्या बढाया, भारताविरोधात काय काय बोलले?
7
Janmashtami 2025: ढाक्कु माकुम ढाक्कु माकुम; 'या' राशींना फळणार गोपाळकाला, काय होणार लाभ?
8
मीरा भाईंदर महापालिकेच्या बनावट जन्म दाखल्याप्रकरणी गुन्हा दाखल, संबंधित महिला बांगलादेशी असल्याचा संशय
9
शाहरुख खानचा 'किंग' पुढे ढकलला, काय आहे कारण? लेकीचा वडिलांसोबत पहिलाच सिनेमा
10
बायडेन यांच्या मुलानं असं काय म्हटलं की ट्रम्पच्या पत्नीला आला भयंकर राग; पाठवली १ अरब डॉलर्सची नोटिस
11
लिस्ट होताच IPO नं दिला १००% चा रिटर्न; पहिल्याच दिवशी दुप्पट झाले गुंतवणुकदारांचे पैसे
12
कहानी में कुछ तो गडबड हैं! काँग्रेसचे राज ठाकरेंना ‘नो ऑब्जेक्शन’; उद्धवसेनेचा मार्ग मोकळा?
13
अर्जुन तेंडुलकर-सानिया जोडी जमली! या क्रिकेटर्सप्रमाणे त्याची कारकिर्दही बहरणार का?
14
'लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही आणि दहशतवाद पसरवण्याचा प्रयत्न', RSS चा ट्रम्प यांच्यावर निशाणा
15
Arjun Tendulkar Engagement: अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको सानिया चांडोक काय करते? तिचा व्यवसाय कोणता? जाणून घ्या
16
Himachal Pradesh Cloudburst : हिमाचलमध्ये पावसाचा कहर, किन्नौरमध्ये ढगफुटी; घरे आणि गाड्या गेल्या वाहून, ३२५ रस्ते बंद
17
त्रिशतकी खेळी करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने अचानक जाहीर केली निवृत्ती, आता केले अनेक गौप्यस्फोट
18
Bitcoin नं तोडले सर्व विक्रम; सोनं-चांदी सोडून क्रिप्टोकडे पळाले गुंतवणुकदार
19
मुंबई ते लंडन... लवकरच बोहल्यावर चढणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची संपत्ती किती? तुमचाही विश्वास नाही बसणार
20
"पुतिन यांनी युक्रेन युद्ध थांबवलं नाही तर...!"; महत्वाच्या बैठकीपूर्वीच ट्रम्प यांची रशियाला खुली धमकी!

कार्यकर्त्यांनी कामाला लागावे

By admin | Updated: July 24, 2016 01:34 IST

जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी

जि. प., न. प. निवडणुकीबाबत : अनिल देशमुख यांचे आवाहन; राकाँची आढावा बैठक गडचिरोली : जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन व मोर्चेबांधणीच्या कामाला लागावे, असे आवाहन राकाँचे गडचिरोली जिल्हा प्रभारी तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल देशमुख यांनी केले. शनिवारी येथील राकाँच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित पक्षाच्या जिल्हा आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मंचावर राकाँचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार, माजी आ. हरिराम वरखडे, राकाँचे कार्याध्यक्ष रवींद्र वासेकर, जि. प. सदस्य जगन्नाथ पाटील बोरकुटे, राकाँच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. हेमंत अप्पलवार, राविकाँचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, हर्षलता येलमुले, सोनाली पुण्यपवार आदी उपस्थित होते. पुढे बोलताना अनिल देशमुख म्हणाले, राकाँच्या जिल्हा कार्यकारिणींने प्रत्येक तालुक्यात शहर कार्यकारिणी गठित करावी, तसेच कार्यकर्त्यांनी पक्ष सदस्यांची आॅनलाईन नोंदणी करावी, असे ते म्हणाले. भाजपप्रणीत केंद्र व राज्य शासनाची जनधन योजना पूर्णत: फसली आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे जनता त्रस्त आहे. त्यामुळे राकाँ कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाची विचारधारा घरोघरी पोहोचवावी, असे यावेळी म्हणाले. याप्रसंगी सुरेश पोरेड्डीवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. गडचिरोली नगर पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकाविण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक डॉ. हेमंत अप्पलवार, संचालन रवींद्र वासेकर यांनी केले तर आभार अरूण हरडे यांनी मानले. बैठकीला रायुकाँचे जिल्हाध्यक्ष प्रा. रिंकू पापडकर, संजय निखारे, युनुस शेख, जयंत येलमुले, अविनाश वरगंटीवार, श्यामसुंदर उराडे, नितीन वडेट्टीवार, रामचंद्र वाढई आदीसह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)