शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

कामगार नोंदणी शिबिर एका दिवसात गुंडाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 23:03 IST

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई व गडचिरोली येथील जिल्हा कामगार कार्यालयाच्या वतीने देसाईगंज येथील नगर परिषदेच्या सांस्कृतिक भवनात २१ ते २३ जुलैदरम्यान तीन दिवस कालावधीचे कामगार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. मात्र हे कॅम्प केवळ एका दिवसांत गुंडाळण्यात आले.

ठळक मुद्देदेसाईगंजातील प्रकार : शेकडो कामगार नोंदणीविना घरी परतले

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ मुंबई व गडचिरोली येथील जिल्हा कामगार कार्यालयाच्या वतीने देसाईगंज येथील नगर परिषदेच्या सांस्कृतिक भवनात २१ ते २३ जुलैदरम्यान तीन दिवस कालावधीचे कामगार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. मात्र हे कॅम्प केवळ एका दिवसांत गुंडाळण्यात आले. त्यामुळे २२ जुलै रोजी नोंदणीसाठी आलेल्या शेकडो कामगारांना आल्यापावली घरी परतावे लागले.सर्व कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शासनाच्या वतीने इमारत व इतर बांधकाम कामगारांची नोंदणी केली जात आहे. त्यादृष्टिकोनातून गडचिरोली, देसाईगंज आदीसह तालुकाठिकाणी शिबिर घेऊन कामगारांची नोंदणी केली जात आहे.देसाईगंज येथे २१ ते २३ जुलैदरम्यान कामगार नोंदणी शिबिर असल्याबाबत प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर माहिती अनेकांकडून कामगारांपर्यंत पोहोचली. त्यामुळे देसाईगंज तालुक्यासह लगतच्या परिसरातील हजारो कामगार नोंदणी करण्यासाठी या शिबिरात आले. पहिल्या दिवशी कामगारांची नोंदणी करण्यात आली. मात्र दुसऱ्या दिवशी २२ जुलैला नोंदणी करून घेणारे कर्मचारीच गायब होते. परिणामी शेकडो कामगारांना स्वगावी परतावे लागले.सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने नांगरणी, चिखलणी व शेतीची इतर कामे सुरू आहेत. त्यामुळे मजुरांची मागणी वाढली आहे. मात्र शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी नोंदणी करणे आवश्यक असल्याचे लक्षात आल्यावर अनेक कामगारांनी मजुरी सोडून देसाईगंज शहर गाठले. मात्र दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी शिबिर गुंडाळण्यात आल्याने तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या कामगारांना स्वगावी परतावे लागले. शिबिराच्या ठिकाणी सूचना फलकही लावण्यात आला नव्हता. सदर प्रकाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.अधिकाऱ्यांवर कारवाई करातीन दिवसांचे शिबिर एका दिवसात गुंडाळल्यामुळे कामगार नोंदणीपासून वंचित राहिले. कामगारांची फसवणूक झाली. या प्रकारामुळे जिल्हा कामगार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी देसाईगंज शहर युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा प्रदेश सचिव शहजाद शेख, पिंकू बावणे यांनी दिला आहे.