शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पं.स.मध्ये कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 05:01 IST

निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता शेंडे यांचा सीएल अर्ज १६ जून रोजी प्राप्त झाला. सदर अर्ज गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांच्याकडे सादर केला असता, त्यांनी शेंडे यांच्या विरोधात अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली. तसेच डाकेतून आलेला अर्ज तुम्ही का स्वीकारला, अशी विचारणा सहायक प्रभारी अधिकारी यांना केली.

ठळक मुद्देबीडीओंवर कारवाई करा : अपमानास्पद वागणूक देत असल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : पंचायत समितीचे गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांच्यावर कारवाई करावी, या मुख्य मागणीसाठी सिरोंचा पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी कामबंद आंदोलन पुकारून कार्यालयासमोर धरणे दिली. याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविले आहे.निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता शेंडे यांचा सीएल अर्ज १६ जून रोजी प्राप्त झाला. सदर अर्ज गटविकास अधिकारी कुणाल उंदीरवाडे यांच्याकडे सादर केला असता, त्यांनी शेंडे यांच्या विरोधात अर्वाच्च भाषेत शिविगाळ केली. तसेच डाकेतून आलेला अर्ज तुम्ही का स्वीकारला, अशी विचारणा सहायक प्रभारी अधिकारी यांना केली.गटविकास अधिकारी हे अशाच पद्धतीने अनेक कर्मचाऱ्यांना मानहानी होईल, अशी वर्तणूक करतात. त्यामुळे सिरोंचा पंचायत समितीचे कर्मचारी कमालीचे त्रस्त झाले आहेत. १ जून रोजी तहसीलदारांनी सिरोंचा येथे कन्टेनमेंट झोन घोषित केले. या झोनमध्ये असलेल्या महिला परिचराला गटविकास अधिकारी कार्यालयात बोलवित आहेत. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. कोरोनाशी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हेतूपुरस्सर कारणे दाखवा नोटीस बजावली जात आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून सिरोंचा येथे अपंग मेळावा आयोजित केला होता. मात्र गटविकास अधिकाऱ्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे या अपंग मेळाव्याला गालबोट लागले. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मानधन देण्यासाठी गटविकास अधिकारी पैसा किंवा वस्तूंची मागणी करतात. मासिक सभेच्या ठरावानुसार अंमलबजावणी केली जात नाही. महिला कर्मचाºयांना स्वत:च्या कक्षात ताटकळत उभे ठेवले जाते, असा आरोप निवेदनातून केला आहे.आंदोलन सुरूच राहणारकुणाल उंदीरवाडे हे गडचिरोली पं.स.मध्ये होते. त्यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांची बदली सिरोंचा येथे केली. येथे सुद्धा ते मनमानी करीत आहेत. त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही, तोपर्यंत कामबंद सुरूच ठेवण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.एका कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार असल्याची कुणकुण लागल्यामुळे काही लोकांनी मुद्दाम हे आंदोलन उभे करून मला टार्गेट करण्याचा प्रयत्न होत आहे. कर्मचाºयांनी कसेही वागावे आणि मी कारवाई करू नये अशी त्यांची इच्छा आहे का? हा चुकीचा पायंडा आहे.- कुणाल उंदीरवाडे, गटविकास अधिकारी, सिरोंचा

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीStrikeसंप