शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सिरोंचा महामार्गाचे काम अपूर्णावस्थेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 00:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यात दोन राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आले आहे. मात्र सदर दोन्ही मार्गाचे काम नियमितपणे सुरू राहून पूर्ण झालेले नाही. सिरोंचा-पातागुड्डम या महामार्गाचे काम गेल्या १५ वर्षांपासून कासवगतीने सुरू असून ते अपूर्णच आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, भामरागड ...

ठळक मुद्देआलापल्ली मार्गाचेही काम प्रतीक्षेत : १५ वर्षांपासून कासवगतीने सुरू आहे काम

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यात दोन राष्ट्रीय महामार्ग मंजूर करण्यात आले आहे. मात्र सदर दोन्ही मार्गाचे काम नियमितपणे सुरू राहून पूर्ण झालेले नाही. सिरोंचा-पातागुड्डम या महामार्गाचे काम गेल्या १५ वर्षांपासून कासवगतीने सुरू असून ते अपूर्णच आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी, एटापल्ली, भामरागड असे चार तालुके असून जिल्हा निर्मितीला ३६ वर्ष पूर्ण होऊनही हे चार तालुके अद्यापही अविकसीत आहेत. या तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याची बकाल अवस्था झाली आहे. आलापल्ली-सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गाचे काम शासनाने मंजूर केले असून या संदर्भात माध्यमांनी वृत्तही प्रकाशित केले आहे. मात्र प्रत्यक्षात या मार्गाच्या कामाला अद्यापही सुरूवात झाली नाही. सिरोंचा-पातागुड्डम या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. तेलंगणा सरकारकडून मेडिगट्टा प्रकल्पासाठी दररोज १०० ते १५० वाहनांची वर्दळ सुरू आहे. या वाहनांच्या वर्दळीमुळे सदर रस्त्याची पूर्णत: वाट लागली आहे. या संदर्भात संबंधित यंत्रणेकडे अथवा प्रशासनाकडे विचारणा केली असता, सकारात्मक उत्तर मिळत नसल्याचे दिसून येत आहे.काम तत्काळ पूर्ण करासिरोंचा तालुक्यातील दोन राष्ट्रीय महामार्गाचे काम लवकर पूर्ण करण्यात यावे. आलापल्ली-सिरोंचा व सिरोंचा ते पातागुड्डम या मार्गाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी आरडाचे उपसरपंच रंगू बापू उर्फ लक्ष्मय्या यांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनातून केली आहे. अहेरी येथे समन्वय समितीच्या सभेत रस्ता कामाबाबत चर्चा करावी, असे त्यांनी म्हटले आहे.