शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

पलसगड-भीमनपायली रस्त्याचे काम सुरू

By admin | Updated: April 19, 2017 02:19 IST

कुरखेडा पंचायत समितीअंतर्गत पलसगड ग्राम पंचायतीच्या वतीने पलसगड-भीमनपायली या रस्त्याचे माती काम

रोहयोतून १४ लाखांचे काम होणार : ३०० मजुरांना मिळाला रोजगार पलसगड : कुरखेडा पंचायत समितीअंतर्गत पलसगड ग्राम पंचायतीच्या वतीने पलसगड-भीमनपायली या रस्त्याचे माती काम महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून सुरू करण्यात आले आहे. १४ लाख रूपयांच्या निधीतून सदर रस्ता तयार होणार आहे. या कामामुळे नोंदणीकृत ३०० मजुरांना रोजगार प्राप्त झाला आहे. गतवर्षी रोजगार हमी योजनेअंतर्गत पलसगड-भीमनपायली या रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले होते. मात्र गतवर्षी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. मात्र या वर्षी सदर रस्त्याच्या कामास सुरुवात झाली आहे. कामाचा प्रारंभ करताना पलसगड ग्राम पंचायतीचे सरपंच उमाजी धुर्वे, उपसरपंच मीनाक्षी गेडाम तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते. पावसाळ्याच्या कालावधीत या रस्त्यावर पाणी साचून चिखल निर्माण होत होता. परिणामी ये-जा करण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. रोजगार हमी योजनेतून मंजूर केलेले सदर रस्त्याचे काम तत्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून तसेच रोहयो मजुरांकडून सातत्याने होत होती. त्यामुळे आता ग्राम पंचायत प्रशासनाने पलसगड-भिमनपायली या रस्त्याचे काम सुरू केले आहे. कुरखेडा तालुक्यात अनेक ग्राम पंचायतीच्या वतीने मजुरांना रोजगार देण्याच्या उद्देशाने गेल्या काही दिवसांपासून शेततळे, बोडी, मजगी, रस्ते आदींचे कामे जोमात सुरू आहे. (वार्ताहर)