सात महिने उलटले : देसाईगंजात रेल्वेमुळे वाहतूक प्रभावित होण्याची समस्या कायमचदेसाईगंज : देसाईगंज येथे रेल्वे स्थानकाजवळ भूमीगत पुलाचे काम सुरू करण्यात आले होते. सुरूवातीच्या कंत्राटदाराने या पुलाचे अर्धे काम केले आहे. त्यानंतर कंत्राटदार बदलविण्यात आला. मात्र नव्या कंत्राटदाराने सात महिने उलटूनही पुलाच्या कामाला सुरूवात केली नाही. परिणामी सदर पुलाचे काम आता पुर्णता थंडबस्त्यात आहे. गडचिरोली जिल्ह्यात वडसा येथे एकमेव रेल्वेस्थानक आहे. लाखांदूर-कुरखेडा तसेच आरमोरीकडे जाण्यासाठी रेल्वेचा प्रवेशद्वार ओलांडावा लागतो. रेल्वेगाडी, मालगाड्या, पॅसेंजर ,एक्सप्रेस आदी गाड्यांमुळे दिवसभरात १० ते १५ वेळा रेल्वेची फाटक बंद केली जाते. परिणामी वाहतूक प्रभावित होते. या समस्येवर उपाय म्हणून सन २०१३ मध्ये रेल्वेच्या भूमीगत पुलाचे काम मंजूर करण्यात आले. आॅक्टोबर २०१४ पासून कंत्राटदारामार्फत सदर पुलाचे काम सुरू झाले. अर्धे काम झाल्यानंतर कामात गती नसल्याच्या कारणावरून या कामाचा कंत्राटदार बदलविण्यात आला. मात्र दुसऱ्या नव्या कंत्राटदाराने सात महिने उलटूनही या कामाला सुरूवात केली नाही.याकडे प्र्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. (वार्ताहर)
रेल्वेच्या भूमीगत पुलाचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2016 00:52 IST