शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरेगाव नजीकच्या पुलाचे काम अपूर्ण

By admin | Updated: July 4, 2016 00:59 IST

रांगी-आरमोरी मार्गावर रांगीपासून सहा किमी अंतरावर असलेल्या कोरेगाव नजीकच्या पुलाचे काम अद्यापही अपूर्ण आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष : चिखलातून काढावी लागत आहेत वाहनेरांगी : रांगी-आरमोरी मार्गावर रांगीपासून सहा किमी अंतरावर असलेल्या कोरेगाव नजीकच्या पुलाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. परिणामी या पुलाच्या बाजुने काढलेल्या चिखलमय कच्च्या रस्त्यावरून वाहनधारकांना वाहने न्यावी लागत आहे. मात्र या पूल बांधकामाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने खासगी कंत्राटदारांमार्फत रांगी-आरमोरी मार्गावर कोरेगावनजीक पुलाचे काम हाती घेण्यात आले. मात्र पावसाळ्याला सुरूवात होऊनही सदर काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प होत आहे. कोरेगावजवळील नाल्यावर पूर्वी कमी उंचीचा पूल होता. पावसाळ्यात या पुलावर पाणी राहत असल्यामुळे या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेऊन शासन व प्रशासनाने नवीन पुलाचे काम मंजूर केले. काही महिन्यांपूर्वी या पुलाच्या बांधकामाला सुरूवात झाली. मात्र कामात गती नसल्याने सदर काम अपूर्ण स्थितीत आहे. वाहतुकीसाठी या पुलाच्या बाजुने कच्चा रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र गेल्या पाच-सात दिवसांपासून रांगी भागात दमदार पाऊस होत असल्याने या कच्च्या रस्त्यावर पाणी साचले आहे. परिणामी चिखलमय रस्त्यातून वाहनधारकांना आपली वाहने काढावी लागत आहे. पावसात या कच्च्या रस्त्यावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने सदर पुलाचे काम तत्काळ पूर्ण करावे, अशी मागणी रांगी परिसरातील नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)