शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मेडिगड्डाचे काम नियमबाह्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 06:00 IST

शुक्रवारी (दि.१३) आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मेडिगड्डाच्या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधताना तेलंगणा सरकारने बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्याचा आरोप केला होता. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या विषयावर जलसंपदा मंत्र्यांनी सविस्तर निवेदन सादर करून सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.

ठळक मुद्देजलसंपदा मंत्र्यांचा ठपका । जुन्या सरकारची विशेष कृपा, सभागृहात सादर केले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिरोंचा तालुक्याच्या सिमेवर तेलंगणा सरकारने अल्पावधीत उभारलेल्या मेडिगड्डा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाच्या कामात नियमांना डावलले असून तत्कालीन राज्य सरकारच्या विशेष कृपादृष्टीमुळे हा प्रकल्प उभारण्यात आला. यात वनकायदा, गौणखनिज आणि इतरही बाबींना तिलांजली देण्यात आल्याचा ठपका राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी सायंकाळी विधीमंडळात निवेदन करताना ठेवला.शुक्रवारी (दि.१३) आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी मेडिगड्डाच्या विषयावर सभागृहाचे लक्ष वेधताना तेलंगणा सरकारने बळजबरीने शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्याचा आरोप केला होता. त्यावर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या विषयावर जलसंपदा मंत्र्यांनी सविस्तर निवेदन सादर करून सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.ना.पाटील यांनी शनिवारी मेडिगड्डा प्रकल्पाच्या उभारणीसंदर्भात निवेदन सादर करताना तत्कालीन सरकारने सर्व बाबींची शहानिशा न करता दबावाखाली आणि घाईगडबडीने आंतरराज्यीय करार केल्याचे निवेदनातून स्पष्ट केले.१९१५ मध्ये प्रकल्पाच्या बांधकामाच्या हालचाली सुरू होताच नागरिकांनी विरोध दर्शवून तीव्र आंदोलन केले. मात्र त्यांचा विरोध डावलून तत्कालीन सरकारने प्रकल्पाला मंजुरी दिली. ४ किमी परिसरात जंगल असताना प्रकल्पासाठी थेट मुंबईतून सचिवाच्या स्वाक्षरीचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले.प्रकल्पाच्या बांधकामासाठी महाराष्ट्राच्या हद्दीतील गौण खनिजाचा वापर करताना तेलंगणा सरकारने त्याची रॉयल्टी बुडविल्याचेही ना.पाटील यांनी स्पष्ट केले.विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी करणारमेडिगड्डा बॅरेजमुळे महाराष्ट्राची जमीन पाण्याखाली गेल्याने उद्भवलेल्या अडचणीसंदर्भात चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याची कार्यवाही प्रस्तावित असल्याचे ना.जयंत पाटील यांनी निवेदनातून स्पष्ट केले. तत्कालीन जिल्हाधिकारी ए.एस.आर.नायक यांच्या भूमिकेवरही जलसंपदा मंत्र्यांनी संशय व्यक्त करून तत्कालीन वनाधिकाऱ्यांच्या आक्षेपाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे सांगितले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प