शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

दिव्यांगांसाठी सामाजिक बांधीलकीतून काम करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 05:00 IST

जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिव्यांगांना त्यांच्या सुप्त कलागुणांना, कौशल्यांना भविष्यात वृद्धिंगत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तालुकास्तरावरील शासकीय कर्मचाऱ्यांना दिव्यांगांसोबत कसे काम करावे, तसेच त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याबाबतच्या प्रक्रियेसाठी प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दिव्यांग व्यक्ती आणि त्यांच्यासोबत जन्मत:च आलेली विविध आव्हाने आपण सर्व जवळून पाहात आलोय. दिव्यांगांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी राजकारणापलीकडे जाऊन सर्वांनीच सामाजिक बांधीलकीतून काम करावे, असे  आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गडचिरोली येथे केले. जिल्हा प्रशासन आणि विविध अशासकीय संस्थांनी मिळून गडचिरोली जिल्ह्यातील दिव्यांगांना नि:शुल्क दिव्यांग साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम मंगळवारी (दि.७) जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात आयोजित केला होता, त्या कार्यक्रमात खा.सुळे बोलत होत्या. या कार्यक्रमाला महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे, जिल्हाधिकारी संजय मीणा, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अनिल रुडे, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य रवींद्र वासेकर, सुरेखा ठाकरे, समाजकल्याण अधिकारी पुष्पलता आत्राम व इतर पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी दिव्यांगांना त्यांच्या सुप्त कलागुणांना, कौशल्यांना भविष्यात वृद्धिंगत करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी तालुकास्तरावरील शासकीय कर्मचाऱ्यांना दिव्यांगांसोबत कसे काम करावे, तसेच त्यांना त्यांचे अधिकार मिळवून देण्याबाबतच्या प्रक्रियेसाठी प्रशिक्षण देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन मित्रा संस्थेचे दिनेश मासोदकर यांनी तर प्रास्ताविक अभिजित राऊत यांनी केले. कार्यक्रमासाठी संजय पुसाम, पंकज खानझोडे, प्रवीण राठोड, निलेश झटाळे, राकेश तिहाडे, सुंदकुमार, नीलिमा हारगुडे, अबोली उबाळे, टिना शेंडे यांनी सहकार्य केले.

१९१ बालकांना मिळाले अत्याधुनिक कर्णयंत्र 

मित्रा संस्था नागपूर व गडचिरोली प्रशासनाच्या मदतीने जिल्ह्यातील २१४ कर्णबधिर व्यक्तींची तपासणी करण्यात आली, त्यापैकी १९१ पात्र बालकांची अत्याधुनिक डिजिटल कर्णयंत्र नि:शुल्क देण्याकरिता निवड करण्यात आली. त्याचे वाटप मंगळवारी करण्यात आले. 

अली यावर जंग नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच ॲण्ड हियरिंग मुंबई, जिल्हा प्रशासन आणि मित्रा संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम घेण्यात आला. मुंबईच्या संस्थेने पहिल्या टप्प्यात अंदाजे १० लाख रुपये किमतीचे अत्याधुनिक कर्णयंत्र ८० जणांना दिले. राज्य शासनामार्फत सुरू असलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र विशेष मोहीम कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील काही निवडक लाभार्थ्यांना युडीआयडी प्रमाणपत्रही देण्यात आले.

जिल्ह्याच्या मागासलेपणाची  ओळख पुसायला हवी-    गडचिरोली जिल्ह्याची ओळख मागास जिल्हा म्हणून, नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून करून दिली जाते. पण आता मोठ्या प्रमाणात विकास कामे पूर्ण झाली आहेत, काही सुरु आहेत. नक्षलवाद आणि मागासलेपण असलेला जिल्हा या चौकटीतून आता आपण बाहेर पडायला हवे, असे खासदार सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या. -    या जिल्ह्यामध्ये पर्यटनाला मोठ्या प्रमाणात वाव आहे. या निसर्गसंपन्न जिल्ह्यात मी वर्षातून एकदातरी येणारच आहे. इतरांनाही भेटी देण्याच्या सूचना करणार असल्याचे त्या म्हणाल्या. तसेच यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईच्या वतीने दिव्यांगांसाठी विविध पुनर्वसनात्मक उपक्रमांसाठी समन्वय साधून काम करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळे