शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल; पित्याच्या आत्महत्याप्रकरणी चार जणांना अटक
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसण्यासाठी कार्य करा

By admin | Updated: December 16, 2014 22:52 IST

आदिवासी, मागास नक्षलप्रभावीत अशी संपूर्ण महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसुन काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय बाळगुण भरीव कार्य करावे,

गडचिरोली : आदिवासी, मागास नक्षलप्रभावीत अशी संपूर्ण महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्याच्या मागासलेपणाचा कलंक पुसुन काढण्यासाठी विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय बाळगुण भरीव कार्य करावे, असे आवाहन अहेरी उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांनी केले. जिल्हा पोलीस विभाग व आदिवासी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र दर्शन सहलीच्या कार्यक्रमाचा आज मंगळवारला जिल्हा मुख्यालयाच्या प्रांगणात समारोप करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, गृह अधीक्षक डी. बी. इलमकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. कन्ना मडावी यांनी सहलीचा आनंद घेऊन आलेल्या आदिवासी मुला- मुलींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, स्वत:चे व जिल्ह्याचे चित्र जिल्ह्यातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना बदलवायचे आहे. जिल्हा बाहेरून कोणीतरी मोठा पुढारी वा अधिकारी येऊन जिल्ह्याचे मागासलेपण पूर्णत: दूर करू शकणार नाही. महाराष्ट्र दर्शन सहलीतून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून जिल्हा विकासास हातभार लावावा, असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या प्रेमात संपूर्ण महाराष्ट्र पडला पाहिजे, असे भव्यदिव्य कार्य करा, असे सांगितले. संचालन जनसंपर्क अधिकारी प्रवीण निंबाळकर यांनी केले. (स्थानिक प्रतिनिधी)