शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत उपकेंद्राचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 23:58 IST

चामोर्शी तालुक्यातील आष्टी व मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांना वीज उपलब्ध व्हावी व या परिसरात वीज समस्या उद्भवू नये, यासाठी अडपल्ली चेक येथे ३३ के व्ही उपकेंद्राचे काम सुरू आहे. २०१८ मध्ये उपकेंद्राच्या कामास सुरूवात झाली.

ठळक मुद्देअडपल्ली चेक येथील काम : परिसराच्या ४० गावांत अनेकदा निर्माण होते वीज समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कघोट : चामोर्शी तालुक्यातील आष्टी व मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांना वीज उपलब्ध व्हावी व या परिसरात वीज समस्या उद्भवू नये, यासाठी अडपल्ली चेक येथे ३३ के व्ही उपकेंद्राचे काम सुरू आहे. २०१८ मध्ये उपकेंद्राच्या कामास सुरूवात झाली. १५ महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापही काम पूर्ण न झाल्याने परिसरातील वीज समस्या केव्हा सुटेल, असा सवाल नागरिक करीत आहेत.दीनदयाल उपाध्याय योजनेतून अडपल्ली चेक येथे ३३ केव्ही वीज उपकेंद्र मंजूर झाल्यानंतर १ जानेवारी २०१८ पासून काम सुरू झाले. त्यानंतर ३१ मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण करण्याचा करार झाला. वीज उपकेंद्र निर्मितीचे काम हैदराबाद येथील एका कंपनीला देण्यात आला होता. मात्र जवळपास १५ महिन्यांचा कालावधी उलटूनही काम पूर्ण झाले नाही. सध्या केवळ ५० टक्केच काम झाल्याचे एकूणच स्थितीवरून दिसून येते. विशेष म्हणजे ३३ के व्ही उपकेंद्र निर्मितीचे काम संथगतीने सुरू असल्याने काम पूर्ण होण्यास विलंब होत आहे. चामोर्शी तालुक्यातील अडपल्ली माल, अडपल्ली चेक, सुभाषग्राम व मुलचेरा तालुक्यातील अनेक गावात वीज समस्या निर्माण होते.विशेषत: पावसाळ्यात या भागात मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात विजेचा लपंडाव वाढतो. रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत तो सुरळीत होत नाही. सध्या कडक उन्हाळ्याला सुरूवात झाली आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास नागरिकांना पंखे, कुलर व एसी लावावी लागते. परंतु याचवेळी वीज पुरवठा वारंवार खंडित होतो, तर कधी वीज पुरवठा गायब असतो. अशावेळी नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतो. या भागातील अनेक ठिकाणचा वीज पुरवठा जंगलातून करण्यात आला आहे. पावसाळ्यात वादळ, वारा सुटल्यानंतर झाडांच्या फांद्या वीज तारांवर पडत असल्याने पुरवठा खंडित होतो. जवळपास चार ते पाच दिवस तो सुरळीत होत नाही. ही समस्या लक्षात घेऊन अडपल्ली चेक येथे ३३ केव्ही विद्युत उपकेंद्र निर्माण केले जात आहे. परंतु सदर उपकेंद्राचे काम संथगतीने सुरू असल्याने या भागातील वीज समस्या सुटण्यास नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे.