शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

१३ लाख दिवस केले काम

By admin | Updated: December 18, 2014 22:55 IST

रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गडचिरोली या मागास जिल्ह्यात विशेषत: महिलांसाठी १३ लाख दिवसांचे रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. या रोजगाराच्या उपलब्धतेमुळे महिलांच्या हाती

अच्छे दिन : रोजगार हमी योजनेतून महिलांनी दाखविली शक्तीगडचिरोली : रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गडचिरोली या मागास जिल्ह्यात विशेषत: महिलांसाठी १३ लाख दिवसांचे रोजगार उपलब्ध करून देण्यात आला. या रोजगाराच्या उपलब्धतेमुळे महिलांच्या हाती मजूरीच्या रूपाने मोठी आर्थिक रक्कम आली. त्यामुळे सध्या महिलांसाठी अच्छे दिन ग्रामीण भागात आल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी केंद्र शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत विशेषत: शेतीशी संबंधित अकुशलक कामे केली जातात. गडचिरोली जिल्ह्यात उद्योग नसल्याने रोजगाराची वानवा आहे. त्यातही महिलांना रोजगार मिळविण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. धानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या चार महिन्यांच्या रोजगारावरच महिलांना अवलंबून राहावे राहते. रोजगार हमी योजनेने मात्र महिलांना रोजगाराची चांगली संधी निर्माण झाली आहे. महिला व पुरूष यांच्या मजूरीत कोणतीही तफावत केली जात नसल्याने महिलावर्ग रोहयोचे काम करण्यास विशेष पसंती दर्शवित आहेत. चालू आर्थिक वर्षात सुमारे १३ लाख ३७ हजार ३६१ दिवस महिलांना रोजगार मिळाला आहे. पुरूषांना १६ लाख ५४ हजार ३६३ दिवस रोजगार उपलब्ध झाला आहे. रोहयोच्या कामावर मजुरीने काम करणाऱ्या महिलेला दिवसाचे किमान १६५ रूपये मजुरी दिली जाते. ग्रामीण भागात एवढी मजुरी मिळणे अशक्य आहे. दिवसभर काम केल्यानंतर सायंकाळी केवळ ८० ते १०० रूपये दिले जातात. त्यातही महिलेला दुपारच्या जेवनासाठी सुट्टी मिळेलच याची शास्वती राहत नाही.रोजगाराअभावी जिल्ह्यातील महिलांना परावलंबी जीवन जगावे लागत होते. आज मात्र महिला रोहयोच्या माध्यमातून स्वत: कमाई करून कुटुंबाला आर्थिक हातभार लावीत आहेत. त्यामुळे कुटुंबाची परिस्थिती पर्यायाने जीवनमान उंचावण्यात फार मोठी मदत झाली आहे. अपवाद वगळला तर रोहयोचे काम वर्षभर सुरू राहते. यामध्ये काही काम दिवसाच्या मजुरीप्रमाणे राहते. सदर काम करण्यास महिला अधिक रूची दाखवित असल्याचे दिसून येत आहे. रोहयोच्या माध्यमातून महिलांना वर्षभर रोजगार मिळण्यास मदत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)