शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सर्व निर्देशांकावर लक्ष ठेवून काम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 23:44 IST

आकांक्षित जिल्हा कार्यक्रम हा निती आयोगाने दिलेला विकासाचा उत्तम असा पथदर्शी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील सर्व निर्देशांकावर अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करुन काम केले तर गडचिरोली जिल्ह्याचा विकास निश्चितपणे होईल असे प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांनी शनिवारी येथे केले.

ठळक मुद्देमुख्य सचिवांच्या अधिकाऱ्यांना सूचना : आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाचा आढावा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : आकांक्षित जिल्हा कार्यक्रम हा निती आयोगाने दिलेला विकासाचा उत्तम असा पथदर्शी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील सर्व निर्देशांकावर अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करुन काम केले तर गडचिरोली जिल्ह्याचा विकास निश्चितपणे होईल असे प्रतिपादन राज्याचे मुख्य सचिव डी. के. जैन यांनी शनिवारी येथे केले.गडचिरोली जिल्हा दौºयावर आलेल्या मुख्य सचिवांनी शनिवारी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमाची आतापर्यंतची आतापर्यंतच्या प्रगतीसंदर्भातील आढावा बैठक घेतली. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने विभागीय आयुक्त अनुपकुमार, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात जे निर्देशांक ठरवून दिले आहे, त्यांचा अंमलबजावणी करणाºया अधिकाºयांनी खोलात जाऊन अभ्यास करावा. सर्व निर्देशांक पूर्ण होईल व आपण ठरविलेली उद्दीष्टे गाठता येतील. यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावे. प्रत्यक्ष गावात पोहोचून योजनांचा लाभ द्यावा, असे निर्देश मुख्य सचिव जैन दिले.यावेळी मुख्य सचिवांनी आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत असलेल्या ४९ निर्देशांकाची पूर्ण माहिती अंमलबजावणी करणाऱ्या विभागांकडून जाणून घेतली. याचे दरमहा गुणांकन कशा पध्दतीने होते, हे जाणून घेतल्यानंतर त्यात आघाडीवर असणाºया जिल्ह्यांशी तुलना होणार असल्याने त्यांनी ठरविलेली उद्दीष्टे जाणून घेतली पाहिजेत, निर्देशांकानुसार काम व्हायला पाहिजे असे मुख्य सचिवांनी सांगितले.कार्यक्रमात जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी याबाबत माहितीचे सादरीकरण केले. जिल्हाधिकारी यांनी आकांक्षित जिल्ह्यासंदर्भात आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यात योजनांच्या माध्यमातून केलेल्या कार्याची माहिती दिली.या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमात जिल्हा नियोजन अधिकारी तेजबहादूर तिडके यांनी उपस्थितांचे आभार मानले.सुक्ष्म जलसिंचनातून रबीचे क्षेत्र वाढवा -अनुपकुमारजिल्ह्यात या निर्देशांकात काम करताना आपण ठरवलेल्या उद्दीष्टांबाबत विविध विभागांच्या अधिकाºयांनी माहिती दिली. जिल्ह्यात वनक्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे वनऔषधीची लागवड करुन तसेच फलोत्पादनातून उपजीविका साधनांची वृध्दी करण्यात याव्या, अशा सूचना विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी यावेळी दिल्या. जिल्ह्यात रबीचे क्षेत्र कमी आहे ते वाढवण्याची गरज आहे. जलयुक्त शिवार, सिंचन विहीरी आणि मामा तलाव यांची मोठी कामे झाल्याने जिल्ह्यात जलसाठा वाढला आहे. त्याचा वापर करुन सुक्ष्म जलसिंचनाच्या माध्यमातून रबीचे क्षेत्र वाढवण्याचे निर्देश अनुपकुमार यांनी दिले. तसेच कीड व रोगांचे प्रमाण कमी करण्यासाठी शेतकºयांना प्रमाणित बियाणांचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे काम कृषी विभागाने करावे, असेही निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.