शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

दारूविक्रेत्यांच्या विरोधात महिलांनी कसली कंबर

By admin | Updated: February 10, 2017 02:16 IST

गडचिरोली या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात दारूचा अवैध व्यापार करून कोट्यधीश झालेले लोक आता राजकारणात उतरले आहेत.

गावागावात लागले फलक : दारूविक्रेते व कुटुंबीयांना निवडून देऊ नकागडचिरोली : गडचिरोली या दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात गेल्या दहा वर्षात दारूचा अवैध व्यापार करून कोट्यधीश झालेले लोक आता राजकारणात उतरले आहेत. अनेक दारूविक्रेत्यांनी त्यांच्या बायकांना मैदानात उतरविल्याने नारी शक्ती या दारूविक्रेत्यांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी सरसावल्या आहेत.विविध गावात अवैध दारूविक्रीच्या व्यापाऱ्यात असलेल्या उमेदवारांच्या विरोधात फलक लावून जनजागृती केली जात आहे. चामोर्शी, गडचिरोली तालुक्यातील काही मतदार संघासह जिल्ह्याच्या विविध भागत फलक झळकू लागले आहे. या फलकावर ‘माता भगिनींनो हात जोडून विनंती आहे, जो उमेदवार तुमच्या नवऱ्याला, मुलाला व भावाला दारू पाजतोय, त्या उमेदवाराला चुकुनही मतदान करू नका, तो गावाच्या विकासाचे नियोजन नाही, तर तुमचे लेकरबाळ उघड्यावर पाडण्याचे नियोजन करतोय’, असे फलक झळकू लागले आहे. त्यामुळे दारूविक्रेत्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय पक्षांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. अवैध दारूच्या व्यवसायात असलेले लोक व त्यांचे कुटुंबीय यांना उमेदवारी देणाऱ्या राजकीय लोकांनाही या महिलांनी जाब विचारण्याची तयारी चालविली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांचे धाबे दणाणले आहे. तसेच सोशल मीडियावरूनही यासंदर्भात व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. लवकरच या महिला ज्या मतदार संघात असे उमेदवार उभे आहेत, तेथे जाऊनही सभांद्वारे येत्या काळात जनजागृती करणार आहे. लोकांना व मतदारांना हात जोडून विनंती करण्याचे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती दारूबंदी चळवळीशी संबंधित कार्यकर्त्यांनी दिली. महिलांच्या या पवित्र्यामुळे उमेदवारांचे धाबे दणाणणार आहे.