शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

दारूविरोधात महिलांचा एल्गार

By admin | Updated: December 11, 2014 23:07 IST

परिसरात खुलेआम दारूविक्री केली जात असून त्यामुळे सामाजिक वातावरण दुषित झाले आहे. परिसरातील दारूविक्री तत्काळ बंद करण्यात यावी, या मागणीसाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती

दारूविक्री बंद करण्याची मागणी : एसडीओ कार्यालयावर दिली धडकअहेरी : परिसरात खुलेआम दारूविक्री केली जात असून त्यामुळे सामाजिक वातावरण दुषित झाले आहे. परिसरातील दारूविक्री तत्काळ बंद करण्यात यावी, या मागणीसाठी अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीच्या नेतृत्वात एसडीओ कार्यालयावर धडक देऊन निवेदन सादर केले. शासनाने गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी केली असली तरी ही दारूबंदी केवळ नावापुरताच मर्यादित झाली आहे. अहेरी परिसरातील प्रत्येक गावात खुलेआम दारू विकली जात आहे. गावातच दारू मिळत असल्याने युवक व विद्यार्थी दारूच्या आहारी जात आहेत. दिवसभर केलेल्या कामाचे पैसे दारूच्या व्यसनात जात आहेत. पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याने दारूविक्रीचे प्रमाण वाढतच चालले आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या महिलांनी एसडीओ कार्यालयावर धडक दिली. यावेळी एसडीओ कार्यालयात तहसीलदार गालापल्लीवार उपस्थित होते. त्यांनी महिलांचे निवेदन स्वीकारले. सदर निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठविले जाणार आहे. दारूविक्री अत्यंत घातक असल्याने दारूविक्री बंद करण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन महिलांना दिले. (तालुका प्रतिनिधी)