शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

दारू विक्रेत्यांना उमेदवारी देणाऱ्या पक्षाला महिला देणार धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2017 01:32 IST

गडचिरोली जिल्ह्यात जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून दारू तस्कराच्या कुटुंबियांना मोठ्या प्रमाणावर उमेदवाऱ्या देण्यात आल्या आहे.

 नेत्यांना जाब विचारणार : राजकीय पक्षांविषयी प्रचंड असंतोष गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून दारू तस्कराच्या कुटुंबियांना मोठ्या प्रमाणावर उमेदवाऱ्या देण्यात आल्या आहे. यात काँग्रेस व भाजप हे दोन्ही पक्ष आघाडीवर आहे. जिल्ह्यात दारूबंदीसाठी मुक्तीपथ सारखे अभियान सुरू असताना व गावागावात व्यसनमुक्तीच्या कामासाठी तंटामुक्त समित्या व महिला समित्या सक्रीय असताना राजकीय पक्षांकडून महिलांच्या प्रवर्गात दारू विक्रेत्याच्या कुटुंबियांना उमेदवारी दिल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोली व चामोर्शी तालुक्यात घडला आहे. त्यामुळे महिला कार्यकर्त्या व व्यसनमुक्तीसाठी काम करणारे लोक प्रचंड नाराज असून या संदर्भात लवकरच जाहीर जनजागृती मोहीम सदर पक्षांच्या विरूध्द राबविणार येणार असल्याची माहिती व्यसनमुक्ती समितीच्या कार्यकर्त्यांनी लोकमतला दिली आहे. पोलीस प्रशासनाने चामोर्शी येथील अवैध दारू व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्याविरूध्द एमपीडीए अंतर्गत कारवाई केली होती. मात्र त्याला अटक करून कारागृहात रवानगी केली नाही. त्याच्या कुटुंबियांनाच राजकीय पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना व्यसनमुक्तीच्या व दारूबंदीच्या कार्यक्रमाशी काहीही देणघेण नाही, असा संदेशच मिळाला आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने या संदर्भात कठोर कायदा करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)