शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
4
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
5
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
6
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
7
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
8
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
9
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
10
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
11
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
12
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
13
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
14
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
15
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
16
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
17
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
18
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
19
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
20
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ

ठाण्यावर महिला धडकल्या

By admin | Updated: February 27, 2015 01:19 IST

स्थानिक विर्शी वार्डात दिवसागणिक दारू व सट्ट्याचे अवैद्य अड्डे वाढत आहेत. याची पोलीस विभागाला माहिती असूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने ...

देसाईगंज : स्थानिक विर्शी वार्डात दिवसागणिक दारू व सट्ट्याचे अवैद्य अड्डे वाढत आहेत. याची पोलीस विभागाला माहिती असूनही कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने बुधवारी रात्री ९ वाजता दोन हजार महिला, पुरूषांचा मोर्चा देसाईगंज पोलीस ठाण्यावर धडकला. या मोर्चाचे नेतृत्त्व नगराध्यक्ष श्याम उईके, विर्शी वाडार्तील नगरसेवक मनोज खोब्रागडे, आबेद अली यांनी केले. वार्डातील दारूबंदीबाबत पोलीस निरीक्षकांसोबत चर्चा केल्या नंतर सकारात्मक आश्वासन मिळाल्यावर महिला व नागरिक माघारी फिरले.सध्या ब्रम्हपुरी मुख्यमार्गावरील कब्रस्तान, बायपास चौक दारूविक्रीचा मुख्य अड्डा बनला आहे. शहरातील हा भाग नवीन वाईन स्टेशनच्या रूपात समोर येत आहे. ब्रम्हपुरी मार्गावरील रहदारीमुळे या वाईन हबवर नेहमीच गर्दी पाहायला मिळत आहे. दारूविक्री सोबत या ठिकाणी सट्टापट्टीही घेतली जाते. यामुळे विर्शी वार्डात अशांतता पसरत चालली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विर्शी वासीयांनी चौकातील व वाडार्तील दारू व सट्टा तत्काळ बंद झाला पाहिजे यासाठी थेट पोलीस स्टेशनवरच मोर्चा काढला. या मोर्चात गावातील शेकडो महिला, तरूणांनी सहभाग घेतला. पोलिसांना दारूविक्रीची कल्पना असून देखील पोलीस प्रशासन कोणत्याच प्रकारची कारवाई करित नसल्याचे महिलांनी यावेळी बोलून दाखविले. पोलीस निरीक्षकांसोबत झालेल्या चर्चेत गावकऱ्यांनी दारूविक्रीबाबत पोलीस प्रशासनाला सूचना कराव्यात, कुठे दारूविक्री होत आहे त्याबाबत माहिती दिल्यास सबंधितांवर तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. नागरिकांमध्ये दारूबंदीबाबतच्या जागृतीमुळे आता तरी पोलीस प्रशासन दारूबंदी करण्यासाठी समोर येईल काय, असा प्रश्न महिलांनी यावेळी उपस्थित केला. मागील वर्षी स्थानिक जुनी वडसा वाडार्तील नागरिकांनी देखील वार्डात दारूबंदी केली. तरीही वार्डात अजूनही छुप्यामागाने दारूविक्री सुरूच आहे. पोलीस प्रशासनाच्या नाममात्र कारवाईमुळे शहरातील दारूविक्रीला उधाण आले आहे. दारूबंदीच्या जिल्ह्यात दारूबंदीकरिता नागरिकांना लढा द्यावा लागत आहे. जिल्ह्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)देसाईगंजच्या ग्रामीण भागातही दारूविक्री जोरातदेसाईगंज नगर पालिकेच्या हद्दीत विविध वार्डांमध्ये दारूविक्री जोरात सुरू असली तरी तालुक्याच्या ग्रामीण भागातही अवैध दारूविक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे महिलांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. कोरेगाव येथे काही दिवसांपूर्वी गावात दारूबंदी करण्यासाठी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरम अभावी ती तहकूब झाली. आता २८ तारखेला सभा घेऊन दारूबंदीच्या निर्णयावर शिक्का मोर्तब होण्याची शक्यता आहे. पोलीस प्रशासन मात्र दारूबंदी करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा नागरिकांचा आरोप आहे.