शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा

By admin | Updated: August 24, 2014 23:30 IST

महिलांनी केवळ चुल व मुलं यामध्ये गुंतुन न जाता स्वयंरोजगार करण्याचा प्रयत्न करावा, यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या अनेक योजना

आलापल्ली : महिलांनी केवळ चुल व मुलं यामध्ये गुंतुन न जाता स्वयंरोजगार करण्याचा प्रयत्न करावा, यामुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. महिलांसाठी जिल्हा परिषदेच्या अनेक योजना असून या योजनांचा लाभ घेऊन स्वयंरोजगार करून स्वत:च्या पायावर उभे व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती अतुल गण्यारपवार यांनी केले.स्थानिक श्रीराम मंदिरात २३ आॅगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. सदस्य विजया विठ्ठलानी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून ग्रा. पं. सदस्य महावीर अग्रवाल, कमलाबाई उप्पलवार, गंगु ठाकरे, इंदिरा सडमेक आदी मान्यवर उपस्थित होते. रक्षाबंधन सोहळ्याला मोदूमोडगु, मद्दीगुडम, रामय्यापेठा, वेलगूर, मलमपल्ली, तलवाडा, पेरमिली येथील बचतगट, महिला मंडळाच्या सदस्या व गृहिणी उपस्थित होत्या. सर्व महिलांनी अतुल गण्यारपवार यांना राखी बांधली. यावेळी इतरही मान्यवरांनी महिलांना रोजगाराविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजया विठ्ठलानी, संचालन ज्योती कोमलवार तर आभार प्रेमिला फरकाटे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बचत गट व महिला मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)