शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

महिलांची २६ कोटींची बचत

By admin | Updated: September 30, 2016 01:30 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महिला समृद्धी बचत ठेव योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागातील केवळ महिलांचे खाते काढले जात आहेत.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उपक्रम : ६५ हजार ४४४ महिलांनी उघडले बँक खातेगडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने महिला समृद्धी बचत ठेव योजना सुरू केली असून या योजनेंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागातील केवळ महिलांचे खाते काढले जात आहेत. मागील दोन वर्षांच्या कालावधीत या योजनेंतर्गत सुमारे ६५ हजार ४४४ महिलांचे बचत खाते काढण्यात आले असून या खात्यावर महिलांनी २६ कोटी ५३ लाख रूपयांची बचत केली आहे. बँकेच्या या उपक्रमामुळे महिलांना बचतीची सवय लागण्यास फार मोठी मदत झाली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात अजूनही आर्थिक साक्षरता झालेली नाही. त्यामुळे अनेक नागरिकांना बँकेचे व्यवहार कळत नाही. अनेक कुटुंबांचे बँक खाते सुद्धा नाही. त्यामुळे त्या कुटुंबाला अल्प बचतीची सवय लागलेली नाही. दरवर्षी प्राप्त झालेले उत्पन्न खर्च होते. आपात्कालीन स्थितीत त्याच्याकडे रूपयाचीही बचत राहत नाही. परिणामी सावकाराकडून किंवा जवळपासच्या नातेवाईकांकडून कर्ज काढावे लागते. ग्रामीण भागातील कुटुंबांना अल्प बचतीची सवय लागावी, या उद्देशाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केवळ महिलांचे खाते उघडण्यासाठी महिला समृद्धी बचत ठेव योजना सुरू केली. या योजनेंतर्गत ग्रामीण व दुर्गम भागातील केवळ महिलांचेच बँक खाते काढले जात आहेत. बँक खाते निघाल्यानंतर या बँक खात्यात थोडीफार रक्कम राहावी, असे प्रत्येकच महिलेला वाटू लागल्यानंतर महिलांनी आपल्या बँक खात्यामध्ये १५ दिवस ते १ महिन्याच्या कालावधीनंतर जेवढी रक्कम शक्य होईल, तेवढी रक्कम जमा करण्यास सुरुवात केली. हळूहळू कुटुंबाच्या उत्पन्नापैकी काही हिस्सा बचत होण्यास सुरुवात झाली. मागील दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे ६५ हजार ४४४ महिलांचे बचत खाते काढण्यात आले आहेत. या बचत खात्यावर सद्य:स्थितीत २६ कोटी ५३ लाख ३ हजार रूपयांची बचत झाली आहे. हळूहळू या योजनेचा ग्रामीण व दुर्गम भागात प्रचार होण्यास सुरुवात झाली असल्याने महिला स्वत:हून बँक खाते काढत असून त्यामध्ये बचत सुद्धा करीत आहेत. या योजनेमुळे महिलांमध्ये आर्थिक साक्षरता निर्माण होण्याबरोबरच बचतीची सवयही लागण्यास फार मोठी मदत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)