शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महिला रूग्णांशी धक्काबुक्की

By admin | Updated: November 16, 2014 22:50 IST

स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात तालुक्यातील पेंचकलापेठा येथील काही महिला रूग्ण कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेकरिता देवलमरी येथील परिचारिकेच्या माध्यमातून तीन दिवसापूर्वी भरती झाल्या.

अहेरी : स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात तालुक्यातील पेंचकलापेठा येथील काही महिला रूग्ण कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेकरिता देवलमरी येथील परिचारिकेच्या माध्यमातून तीन दिवसापूर्वी भरती झाल्या. शुक्रवारला या महिलांची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र शनिवारी व रविवारी या महिला रूग्णांकडे वॉर्डात एकही डॉक्टर व परिचारिका तपासणीसाठी फिरकल्या नाही. दरम्यान शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास बचत गटाच्या महिला भोजन घेऊन वॉर्डात आल्या. भोजनावरून महिला रूग्ण व बचत गटांच्या महिलांमध्ये धक्काबुक्की झाल्याने आज महिला रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी भोजनावर बहिष्कार टाकला असल्याची माहिती रूग्णांचे नातेवाईक नामी मागम यांनी दिली आहे.प्राप्त माहितीनुसार, बेबी नामी मागम (२५), इमला श्यामराव झाडे (२७) रा. पेंचकलापेठा व देवलमारीच्या काही महिला परिचारिकेच्या माध्यमातून शस्त्रक्रियेकरिता अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती झाल्या. तुमची पूर्ण देखभाल करून योग्य सेवा व भोजन देऊ अशी आशा संबंधीत परिचारिकेने या महिलांना दिली होती. मात्र प्रत्यक्ष शस्त्रक्रियेनंतर आरोग्य सेवा व भोजनाबाबत गैरसोयग झाल्याची माहिती रूग्णांनी दिली. शनिवारी एकही डॉक्टर व परिचारिका वॉर्डात फिरकले नसल्याने या महिला रूग्णांची दैनंदिन तपासणी झाली नाही. शनिवारी सायंकाळी बचत गटाच्याय महिला भोजन वाटपाकरिता वॉर्डात आल्या. या महिलांनी प्रत्येक रूग्ण एका नातेवाईकाला भोजनाचे ताट दिले. मात्र नातेवाईकांनी काही रूग्णांचे भोजनाचे डब्बे भरून आणल्याने सदर डब्ब्यातील भोजन संबंधीत महिला रूग्णांना दिले. सदर बाब भोजन वाटप करणाऱ्या महिलांना पटली नाही. या महिलांनी ज्यांच्यासाठी डब्बे आले त्यांचे भोजनाचे ताट हिसकावून घेतले. दरम्यान बचत गटाच्या महिला व वॉर्डातील महिला रूग्ण यांच्यात धक्काबुक्की झाली. दरम्यान एक महिला रूग्ण धक्काबुक्कीमुळे बेडकडे पडली, अशीही माहिती रूग्णांचे नातेवाईक नामी मागम यांनी दिली आहे. सदर प्रकार घडल्यामुळे या वॉर्डातील रूग्ण व नातेवाईकांनी रूग्णालयातील भोजन उपजिल्हा रूग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी येईपर्यंत घेणार नसल्याचे ठाम सांगून रूग्णालयातील बचत गटांकडील भोजनावर बहिष्कार टाकला. यासंदर्भात रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी यांना भ्रमणध्वनीवरून विचारणा केली असता, रूग्णालयात घडलेल्या सदर प्रकारची माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी)