शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

बिबट्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2021 05:00 IST

सदर महिला घरामागे भांडी घासत असताना जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. आरडाओरड केल्यानंतर तिच्या मुलाने व शेजारच्या युवकांनी तिकडे धाव घेतली आणि महिलेला बिबट्याच्या तावडीतून सोडवत त्याला परतवून लावले. यामध्ये महिलेच्या गळ्यावर गंभीर जखमा झाल्या आहे. नशीब बलवत्तर म्हणून तिचे प्राण वाचले, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.

लाेकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी-इल्लूर येथील पेपर मिल कॉलनीत बुधवारी सकाळी एका बिबट्याने महिलेवर हल्ला केल्याने ती गंभीर जखमी झाली. ही घटना सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. बबिता दिलीप मंडल (४५ वर्षे) असे जखमी महिलेचे नाव आहे.सदर महिला घरामागे भांडी घासत असताना जवळच दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. आरडाओरड केल्यानंतर तिच्या मुलाने व शेजारच्या युवकांनी तिकडे धाव घेतली आणि महिलेला बिबट्याच्या तावडीतून सोडवत त्याला परतवून लावले. यामध्ये महिलेच्या गळ्यावर गंभीर जखमा झाल्या आहे. नशीब बलवत्तर म्हणून तिचे प्राण वाचले, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केली.सदर महिलेवर आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान आलापल्लीच्या दौऱ्यावर असलेले वन वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पेपर मिल कॉलनीच्या मागे मोठ्या प्रमाणात सुबाभूळाची झाडे वाढली आहेत. त्यात बिबट्याला लपायला जागा मिळत आहे. त्यामुळे ती झाडे विरळ करण्याच्या सूचना त्यांनी नागरिकांना दिल्या. बिबट्याला पकडण्याची परवानगीया अगोदरही बिबट्याने पेपरमिल कॉलनीत एका ६ वर्षीय मुलावर   हल्ला करून जखमी केले होते. मार्कंडा (कं) जंगलात  एका ८ वर्षांच्या मुलाला ठार केले होते. सदर घटनेमुळे बिबट्याची दहशत कायम असून त्या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी होत आहे. याबाबत मार्कंडाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी भारती राऊत यांना विचारले असता बिबट्याला पकडण्याची परवानगी मिळाली असून लवकरच पेपरमिलमध्ये पिंजरा लावून बिबट्याला पकडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :leopardबिबट्या