शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल चळवळीत येण्यासाठी प्रवृत्त करणा-या महिलेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2018 20:47 IST

बक-या चारण्यासाठी जाणा-या एका विवाहित महिलेला आणि एका अल्पवयीन मुलीला नक्षल चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करून नेणा-या महिलेला पोलिसांनी अटक केली

गडचिरोली - बक-या चारण्यासाठी जाणा-या एका विवाहित महिलेला आणि एका अल्पवयीन मुलीला नक्षल चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करून नेणा-या महिलेला पोलिसांनी अटक केली. तसेच तिच्यासोबत जात असलेली महिला व मुलीलाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, भामरागड तालुक्यातील नारगुंडा येथील रहिवासी असलेली रुकमी लालू नरोटी (३२) ही महिला एटापल्ली लगतच्या एटापल्ली टोला येथे आपल्या नातेवाईकांकडे एक महिन्यापासून राहात होती. काही दिवसांपासून तिने बकºया चारण्यासाठी जाणाºया महिला व मुलींशी मैत्री करून त्यांना नक्षल चळवळीत सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केले. दरम्यान दि.२३ रोजी एटापल्लीतील एक २० वर्षीय विवाहित महिला आणि एटापल्ली टोला येथील १४ वर्षीय मुलगी शेतावर बकºया चारण्यासाठी गेले असताना तिकडूनच रुकमी हिने त्या दोघींना गावाबाहेरील नाक्यावरून प्रवासी वाहतूक करणाºया ट्रॅक्स गाडीतून आलापल्ली व तेथून भामरागड तालुक्यातील लाहेरी येथे नेले. यावेळी त्या ट्रॅक्समध्ये गावातील एक ओळखीचा इसम दिसला असता कामानिमित्त आलापल्लीला जात असल्याचे महिलेने त्याला सांगितले.लाहेरी येथे दिनेश कटीया पुंगाटी याच्याकडे त्या दोघींना ठेवून रुकमी नरोटी ही दि.२५ ला पुन्हा एटापल्लीत आली. आपल्यावर संशय येऊन नये म्हणून ती लाहेरीला नेऊन ठेवलेल्या महिलेच्या घरी जाऊन तिच्याबद्दल चौकशी करू लागली. त्यामुळे महिला बेपत्ता झाल्याने आधीच चिंतेत असलेल्या महिलेच्या घरच्या लोकांना तिच्याबद्दल संशय आला. त्यांनी रुकमीला उलटसुलट प्रश्न विचारले असता ती समाधानकारक उत्तर देऊ शकली नाही. त्यानंतर तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर तिने दोघींनाही लाहेरीत नेऊन ठेवल्याची कबुली दिली. त्यानंतर त्या दोघींना पोलिसांनी लाहेरी येथून एटापल्लीत आणले. मात्र त्या अजूनही आम्हाला त्या महिलेसोबतच जायचे आहे, असे सांगत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यावरून त्यांचे किती मनपरिवर्तन करण्यात आले हे लक्षात येते.दरम्यान पोलिसांनी रुकमी नरोटी हिच्याविरूद्ध भादंवि कलम ३६३, ३६५, ३६८, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून तिला दोन दिवसांचा पीसीआरही मिळाला आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार सचिन जगताप करीत आहे.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीArrestअटक