शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
3
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
4
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
5
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
6
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
9
धक्कादायक! ब्रेकअपमुळे पाचवीतील ४ मुलींनी रचला वर्गातील मुलाच्या हत्येचा कट
10
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
11
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
12
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
13
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
14
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
15
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
गृहकर्ज स्वस्त झाल्यानंतरही मुंबईत घर घेणं महाग! पण देशातील 'हे' शहर आहे बजेट फ्रेंडली; किती पडतो हप्ता?
18
'आता बांबू, शेण आणि सेंद्रिय कचऱ्यावर चालणार गाड्या', नितीन गडकरींनी सांगितली सरकारची योजना
19
जाम घाबरलेला रोहित शर्मा; किंग कोहलीच्या रुपात देवच पावला! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील खास किस्सा
20
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर

शिफा प्रकरणात एलसीबीकडून साक्षीदारांचे बयान सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

देसाईगंजमध्ये आधी महिलावर्गाच्या मार्फत स्वस्त दरात विविध वस्तू देणाऱ्या शिफाच्या जाळ्यात अनेक लोक ओढल्या गेले. त्यानंतर नागरिकांनी विविध प्रकारच्या वस्तूंसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक तिच्याकडे केली. पण शिफाने तिच्याकडे विविध वस्तूंसाठी अग्रिम स्वरूपात जमा केलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला होता.

ठळक मुद्देपुरवणी तपास : पडद्यामागील आरोपी समोर येणार का?

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देसाईगंज येथील बहुचर्चित शबाना ऊर्फ शिफा मोहम्मद चौधरी या महिलेच्या माध्यमातून अनेक लोकांची फसवणूक झालेल्या प्रकरणाचा पुरवणी तपास स्थानिक गुन्हे शाखेमार्फत सुरू आहे. या प्रकरणातील साक्षीदार महिलांचे बयाण घेण्याचे काम सुरू असून त्यामार्फत पोलीस या प्रकरणाचा पाया अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र या प्रकरणात पडद्यामागे असलेले आरोपी आतारी समोर येणार का, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.देसाईगंजमध्ये आधी महिलावर्गाच्या मार्फत स्वस्त दरात विविध वस्तू देणाऱ्या शिफाच्या जाळ्यात अनेक लोक ओढल्या गेले. त्यानंतर नागरिकांनी विविध प्रकारच्या वस्तूंसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक तिच्याकडे केली. पण शिफाने तिच्याकडे विविध वस्तूंसाठी अग्रिम स्वरूपात जमा केलेली कोट्यवधी रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला होता. वर्षभरापूर्वी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर देसाईगंज पोलिसांनी शिफा व तिचा भाचा यांना उत्तर प्रदेशातून अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. पण या प्रकरणातील अनेक बाजू अजून पुढे आल्या नसल्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या सूचनेवरून स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा पुरवणी तपास सुरू केला आहे. त्यामुळे या प्रकरणात अजूनही पडद्यामागे असलेल्या आरोपींची नावे पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.आतापर्यंत एलसीबीने जवळपास १८ महिलांचे बयान घेतले असून अजून बºयाच लोकांचे बयाण बाकी आहेत. त्यामुळे तपासाला वेळ लागला तरी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात तो योग्य प्रकारे होईल, असा विश्वास तपास अधिकारी पो.निरीक्षक उल्हास भुसारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. सध्या शिफा आणि तिचा भाचा न्यायालयीन कोठडीत आहेत.नातेवाईकांचीही केली होती फसवणूकदेसाईगंज शहरातील शेकडो लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून कोट्यवधीचा चुना लावणाºया शिफाने आपल्या नातेवाईकांनाही सोडले नव्हते. २०१२ मध्ये तिने आपल्या सासºयाचा प्लॉट विकून लाखो रुपये कमविले होते. या प्रकरणी तिच्या विरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल आहे. मागील पाच वर्षांपासून देसाईगंजात वास्तव्यास असलेल्या शबाना ऊर्फ शिफा मोहम्मद चौधरी ही देसाईगंजात ब्युटी पार्लरचा लहानसा व्यवसाय करीत होती. मात्र कोट्यवधीचा चुना लावल्यानंतर तिचे नाव एकदम चर्चेत आले होते. परंतु तिची पूर्वपार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याची बाब आधी लोकांना माहीत नसल्यामुळे ते तिच्या जाळ्यात ओढल्या गेले होते.

टॅग्स :fraudधोकेबाजी