शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्थानांतर रोखणार - लोकप्रतिनिधी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:53 IST

तब्बल ५५ वर्षांपासून गडचिरोलीच्या वनवैभवात भर घालणाऱ्या कमलापूर येथील हत्तींचे पेंच व्याघ्र प्रकल्पात होणारे स्थानांतरण रोखण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तब्बल ५५ वर्षांपासून गडचिरोलीच्या वनवैभवात भर घालणाऱ्या कमलापूर येथील हत्तींचे पेंच व्याघ्र प्रकल्पात होणारे स्थानांतरण रोखण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे.सदर हत्तींचे १५ फेब्रुवारीपर्यंत स्थानांतरण करण्याचा आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी काढला होता. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच कमलापूर परिसरासह जिल्हावासियांमध्ये तीव्र भावना उमटल्या. त्यामुळे पालकमंत्र्यांसह खासदारांनीही याला विरोध दर्शविल्याने हत्ती कॅम्पचे स्थानांतर रोखण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.१९६२ साली कमलापुरात केवळ एक हत्ती होता. काही वर्षानंतर आलापल्ली येथून दुसरा हत्ती आणण्यात आला. नंतर त्यांची पिलावळ झाली. आता तीन नर आणि चार मादी असे सात हत्ती येथे आहेत. वाघांचा माग घेण्याचे प्रशिक्षण या हत्तींना पेंच प्रकल्पात दिले जाणार असल्याचे निमित्त सांगण्यात आले आहे. मात्र कमलापुरातही हे हत्ती रिकामे नाहीत. जंगलातून मोठमोठी सागाची लाकडे वाहून नेण्यासाठी त्यांचा वापर कित्येक वर्षांपासून केला जातो. याशिवाय पर्यटकांच्या दृष्टीने हे हत्ती आकर्षणाचे केंद्र आहे.एका ठिकाणी सात हत्ती पहायला मिळणे पर्यटकांसाठी दुर्मिळ असते. पण कमलापुरात ती सोय आहे. हे हत्ती येथून हलविल्यास गडचिरोली जिल्ह्यात येणाऱ्या वनपर्यटकांचा हिरमोड झाल्याशिवाय राहणार नाही. औद्योगिक विकासाअभावी रोजगाराची दुसरी साधनं जिल्ह्यात नाहीत. किमान पर्यटकांचा ओढा वाढल्यास त्यातून काही प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. त्यामुळेच नागरिकांचाही हत्तींच्या स्थानांतरणास विरोध आहे. स्थानांतराबाबत वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय सुरू असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले.पालकमंत्री व खासदारांनी गांभीर्याने घेतला विषयवनराज्यमंत्री असलेल्या पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी हत्तींच्या स्थानांतराचा हा विषय गांभिर्याने घेतला आहे. विशेष म्हणजे कमलापूर हे त्यांच्या गृहमतदार संघातील गाव आहे. त्यामुळे ‘लोकमत’ने हा विषय निदर्शनास आणून दिल्यानंतर ना.आत्राम यांनी हत्ती कॅम्पचे स्थानांतर होऊ दिले जाणार नाही, असा निश्चिय लोकमतकडे व्यक्त केला.जिल्ह्याचे खासदार अशोक नेते यांनीही यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. हत्ती कॅम्प हा गडचिरोली जिल्ह्याचे वैभव आहे. हे वैभव दुसरीकडे नेल्यास चुकीचा संदेश जाईल. पर्यटकांना या जिल्ह्याकडे आकर्षित करण्यासाठी अधिकाधिक सुविधा द्याव्यात अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली