शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनात जिल्ह्यातील ५३ प्रश्नांवर आवाज उठविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:06 IST

अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विशेषत: विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी आपण आॅनलाईन जवळपास ५३ प्रश्न अधिवेशनात मांडले आहेत.

ठळक मुद्देदेवराव होळी यांची माहिती : ग्रामीण भागात उद्योग निर्मितीवर भर

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विशेषत: विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या मार्गी लावण्यासाठी आपण आॅनलाईन जवळपास ५३ प्रश्न अधिवेशनात मांडले आहेत. यात २७ प्रश्न तारांकित, १८ लेक्षवेधी तर ८ प्रश्न अर्धातास चर्चेसाठी ठेवले आहेत. या प्रश्नांमध्ये जिल्ह्यातील मागील अनेक वर्र्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांचा समावेश करण्यात आला आहे. सदर प्रश्न मार्गी लागावे, यासाठी अधिवेशनादरम्यान आवाज उठविला जाईल, अशी माहिती आमदार डॉ. देवराव होळी यावेळी दिली.मागील अनेक वषार्पासून शहरी भागात उद्योगांसाठी जागा (एमआयडीसी) निश्चित करण्यात आली आहे. यातील अनेक भूखंड उद्योजकांनी घेतले आहे. मात्र, उद्योग सुरू झाले नाही. त्यामुळे या परिसरात उद्योग सुरू करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा ग्रामीण भागात; विशेषत: पेसांतर्गत येणाºया गावांमध्ये लघू उद्योग निर्माण करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत, यासाठी सर्वतोपरी आपण सहकार्य करणार आहे, अशी माहिती स्थानिक सर्कीटहाऊस मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिली.'व्हिलेज इंडस्ट्रीज' या प्रकल्पाच्या माध्यमातून पोर्ला येथे कोसा उत्पादन केंद्रासह त्याच्यापासून धागा व कापड तयार करण्याचा उद्योग सुरू करण्यात येणार आहे. स्थानिक पातळीवर उत्पादीत होणाºया सामुग्रीवर उद्योग व्यवसाय कसे सुरू करता येईल, यासाठी सुद्धा आपले प्रयत्न सुरू झाले आहे. असेही ते म्हणाले. यासोबतच जिल्हा निवड मंडळ, रिक्त पदे भरण्यासाठी जिल्ह्याला विशेष सूट देण्यात यावी, जिल्ह्यातील ओबीसीचे आरक्षण पूर्ववत करण्यात यावे, शिष्यवृत्ती, बंगाली बांधवांना कायमस्वरूपी पट्टे, सिंचनासाठी वनजमिनीत सूट आदी प्रश्न अधिवेशनात उपस्थित केले जाणार आहे. अशी माहिती आ. डॉ. देवराव होळी यांनी दिली. यापत्रकार परिषदेला ओबीसी सेलचे भाष्कर बुरे, जनार्धन साखरे, डॉ. मसराम आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.जमिनी वर्ग १ करण्याची मागणीजिल्ह्याच्या विकासात महत्वाची भूमिका बजाविणाºया ग्रामपंचायतीचे विभाजन करण्यात येणार आहे. नुकतेच शासनाने महसूल मंडळ घोषीत केले. त्याच धर्तीवर गटग्रामपंचायतीचे विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, जिल्ह्यातील अनेक शेतकºयांच्या जमिनी वर्ग- २ मध्ये आहेत. शासनाने त्या जमिनी वर्ग १ करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र प्रशासनातील अधिकारी वेगवेगळ्या अटी, शर्ती व नियम सांगत आहेत. त्यामुळे जमिनी वर्ग २ होण्यास अडथळे निर्माण होत आहेत. हा मुद्दा अधिवेशनादरम्यान लावून धरला जाईल.ग्रामीण रूग्णालयात पात्रतापूर्ण वैद्यकीय अधिकारी देण्यात यावी, यासाठीसुद्धा आपण प्रश्न टाकला आहे. किमान एका रूग्णालयात एम.बी.बी. एस. शैक्षणिक पात्रता असलेला वैद्यकीय अधिकारी देण्यात यावा, या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.

टॅग्स :Devrao Holiदेवराव होळी