शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

विकास आराखडा बनविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 23:14 IST

खुर्सा येथील नागरिक गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक दिवसांपासून गावात नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देखासदारांचे आश्वासन : खुर्सा येथे स्वच्छता, वृक्षारोपण व आरोग्य शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : खुर्सा येथील नागरिक गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. अनेक दिवसांपासून गावात नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. ग्रामस्थांची गावाच्या विकासाबद्दल असलेली तळमळ बघून या गावाचा आदर्श गाव म्हणून प्रस्ताव तयार करणार असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले.खुर्सा येथे २९ सप्टेंबर रोजी स्वच्छता अभियान, वृक्षारोपण व अन्य कार्यक्रमाचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.सर्वप्रथम गावकºयांनी वाजतगाजत गावातून गोदरीमुक्तीची रॅली काढली. ही रॅली जिल्हा परिषद शाळेत विसर्जीत झाल्यानंतर मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आ. डॉ. देवराव होळी, माजी जि. प. सदस्य प्रशांत वाघरे, संवर्ग विकास अधिकारी पचारे, उपसरपंच संतोष तुलावी, पोलीस पाटील प्रशांत रामटेके, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष मनोज उरकुडे, आनंदराव क्षीरसागर उपस्थित होते.केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाºया योजनांचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खा. अशोक नेते यांनी केले. यावेळी प्रास्ताविकातून ताराचंद मेश्राम यांनी गावातील विविध समस्या मांडल्या. खुर्सा गावाचा आदर्शगाव म्हणून शासनाकडे पाठपुरावा करावा, खा. नेते यांनी खुर्सा गावास दत्तक घ्यावे, शाळेच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, उपसा सिंचन योजना त्वरित सुरू करावी, शालेय विद्यार्थ्यांसाठी गडचिरोली-खुर्सा सकाळी ७ वाजताची बस सेवा सुरू करावी, मंजूर असलेल्या कोल्हापुरी बंधाºयाचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी केली. खा. अशोक नेते यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. बालाजी बावणे यांनीही मनोगत व्यक्त केले.