शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीचे रूप पालटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 22:31 IST

शासनाच्या निधीतून देसाईगंज येथे दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाच्या कामास प्रारंभ झाला असून हे काम प्रगतीपथावर आहे. सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्यानंतर या दीक्षाभूमीचे रूप पालटणार आहे.

ठळक मुद्देसौंदर्यीकरणाचे काम सुरू : पर्यटनस्थळाचा ‘क’ दर्जा प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : शासनाच्या निधीतून देसाईगंज येथे दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाच्या कामास प्रारंभ झाला असून हे काम प्रगतीपथावर आहे. सौंदर्यीकरणाचे काम १०० टक्के पूर्ण झाल्यानंतर या दीक्षाभूमीचे रूप पालटणार आहे.तब्बल ६३ वर्षानंतर देसाईगंज येथील दीक्षाभूमीची जागा समस्य जागृत बौद्ध महिला समितीच्या नावाने झाली. यासाठी शासन दरबारी प्रचंड पायपीट करावी लागली. अखेर गतवर्षी दीक्षाभूमीच्या जागेचा तिढा सुटला. राज्याच्या समाजकल्याण विभागाने दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाचे काम हाती घेतले. पहिल्या टप्प्यात एकूण ५४ लाख रूपये या कामासाठी मंजूर करण्यात आले आहे.मंजूर निधीतून प्रवेशद्वार व इतर कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती महिला समितीच्या सचिव ममता जांभुळकर यांनी दिली आहे. या दीक्षाभूमीला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळावा, यासाठी सदर समितीने शासनाकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीने एक ठराव पारित करून सदर दीक्षाभूमीला पर्यटनस्थळाचा ‘क’ दर्जा प्रदान केला. तसेच याबाबतचे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील बौद्ध समाजाबांधवांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. वडसा येथील दीक्षाभूूमीच्या परिसरात पहिल्या टप्प्यात सांची दरवाजा, अंतर्गत रस्ते, प्रसाधनगृह, बगीचा, वाचनालय, इमारत आदी कामांचा समावेश आहे.सांची प्रवेशद्वाराचे काम प्रगतीपथावर आहे. धम्मपीठ बनविण्यासाठी स्थानिक विकास निधी मंजूर असल्याची माहिती आहे. हे सुद्धा काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील हजारो बौद्ध समाजबांधव देसाईगंज येथील दीक्षाभूमीवर जाऊन तथागत गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतात.