शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वन विभागाने शोधला वन्यजीवाचा सांगाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:29 IST

आलापल्लीच्या जंगलात रानगव्याचा सांगाडा व निलगायीचा पाय पडून आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने शनिवारी प्रकाशित केले. त्यानंतर वन विभागामध्ये एकच खळबळ माजली. वन विभागाच्या चमूने शनिवारीच या परिसराची पाहणी केली असता, त्या ठिकाणी मृत प्राण्याचा सांगाडा व पाय आढळून आला आहे.

ठळक मुद्देडीएनए टेस्ट होणार : लोकमतच्या वृत्ताची दखल

लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : आलापल्लीच्या जंगलात रानगव्याचा सांगाडा व निलगायीचा पाय पडून आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने शनिवारी प्रकाशित केले. त्यानंतर वन विभागामध्ये एकच खळबळ माजली. वन विभागाच्या चमूने शनिवारीच या परिसराची पाहणी केली असता, त्या ठिकाणी मृत प्राण्याचा सांगाडा व पाय आढळून आला आहे.पाच दिवसांपूर्वी आलापल्ली परिसरात रानगव्याचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. वन विभागाने दुर्लक्ष केल्याने रानगव्याचा मृत्यू झाला, असा आरोप नागरिकांकडून करण्यात येत होता. त्याचबरोबर भामरागड मार्गावर आलापल्लीपासून अर्धा किमी अंतरावर रानगव्याप्रमाणे असलेल्या वन्यजीवाच्या तोंडाचा भाग तसेच निलगायीच्या पायाप्रमाणे एक पाय तुटून पडला होता. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर वन विभागाच्या चमूने घटनास्थळ गाठून कवठी व पाय ताब्यात घेतले. सदर कवठी नेमकी रानगव्याची व पाय निलगायीचा आहे काय? हे तपासण्यासाठी हैदराबाद येथे डीएनए टेस्ट केली जाणार आहे. जंगलात आढळलेले पाय व कवठी उपविभागीय वन अधिकारी रवी अग्रवाल यांच्या उपस्थितीत जाळण्यात आले आहे, अशी माहिती आलापल्ली वन विभागातील अधिकाऱ्यांनी लोकमतला दिली. 

टॅग्स :forest departmentवनविभाग