शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जंगली हत्तींच्या धुमाकुळाने आतापर्यंत 23 लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 05:00 IST

मागील वर्षीच्या ऑक्टाेबरपासून डिसेंबर महिन्यापर्यंत चार तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये धुमाकूळ माजवून पुन्हा परतीच्या वाटेला लागलेले २३ जंगली हत्ती सध्या कुरखेडा तालुक्याच्या गांगसायटाेला (हेटळकसा) बिटात वावरत आहेत. याच भागात टिपागडी नदी एकाच मार्गाला सातवेळा ओलांडून जाते. हा परिसर मालेवाडा वनपरिक्षेत्रात येताे. मुबलक पाणी व भरपूर प्रमाणात बांबूचा चारा उपलब्ध असल्याने महिनाभरापासून हत्तींनी त्या भागात तळ ठोकला आहे

गोपाल लाजुरकरलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : चार महिन्यांपूर्वी छत्तीसगड राज्यातून काेरची तालुक्यात दाखल झालेल्या जंगली हत्तींनी सुरुवातीचे तीन महिने बराच धुमाकूळ घातला. त्यात धानासह कडधान्य पिकाचे माेठ्या प्रमाणावर नुकसान केले. वनविभागाकडून वेळीच पंचनामे करून नुकसानग्रस्तांना आतापर्यंत २२ लाख ९२ हजार ३३४ रुपयांची भरपाई देण्यात आली. यात गडचिराेली व वडसा वनविभागातील गावांचा समावेश आहे.छत्तीसगड राज्यातून काेरची तालुक्यात दाखल झाल्यानंतर हत्तींच्या कळपाने काेरची, कुरखेडा, धानाेरा, आरमाेरी व देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ माजवून धान, उडीद, मूग, तुरी आदी पिकांचे नुकसान केले. यात धानाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

२० घरांची भरपाई मिळणार काय?गडचिराेली वनविभागात येणाऱ्या धानाेरा तालुक्याच्या मुरूमगाव वनपरिक्षेत्रातील २० घरे, गाेठे जंगली हत्तींनी उद्ध्वस्त केली. माेहफुलाच्या वासामुळे हत्तींनी या घरांवर हल्ला चढविल्याचे वनाधिकारी सांगतात. परंतु नुकसान भरपाईमध्ये या घरांचा समावेश करण्यात आला नाही. वनपरिक्षेत्र अधिकारी, गृह विभाग, बांधकाम अभियंता, ग्रामसेवक व तलाठी यांच्या समितीच्या अहवालानंतरच त्यांना भरपाई मिळणार आहे.

हत्ती रमले ‘टिपागडी’च्या प्रेमात-    मागील वर्षीच्या ऑक्टाेबरपासून डिसेंबर महिन्यापर्यंत चार तालुक्यात शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये धुमाकूळ माजवून पुन्हा परतीच्या वाटेला लागलेले २३ जंगली हत्ती सध्या कुरखेडा तालुक्याच्या गांगसायटाेला (हेटळकसा) बिटात वावरत आहेत. याच भागात टिपागडी नदी एकाच मार्गाला सातवेळा ओलांडून जाते. हा परिसर मालेवाडा वनपरिक्षेत्रात येताे. मुबलक पाणी व भरपूर प्रमाणात बांबूचा चारा उपलब्ध असल्याने महिनाभरापासून हत्तींनी त्या भागात तळ ठोकला आहे, असे मालेवाडाचे आरएफओ स्वप्नील ढाेणे यांनी सांगितले. 

बंगालच्या टीमकडून हाेत आहे माॅनिटरिंग-    मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी बंगालमधून आलेली १२ सदस्यीय टीम महिनाभरापासून जंगली हत्तींच्या हालचालींवर देखरेख ठेवत आहे. तसेच कर्मचाऱ्यांकडून याेग्य माॅनिटरिंग सुरू आहे.

जंगली हत्तीच्या कळपाने ऑक्टाेबर ते डिसेंबर महिन्यापर्यंत एकूण २१५ शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान केले. यामध्ये गडचिराेली वनविभागातील सर्वाधिक १९६ शेतकरी तर वडसा वनविभागातील १९ शेतकऱ्यांचा समावेश आहे. ही सर्व प्रकरणे वनविभागाने मंजूर केली आहेत. गडचिराेली वनविभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १९ लाख ३४ हजार २३४ रुपये तर वडसा विभागात ३ लाख ५८ हजार १०० रुपयांची भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

 

टॅग्स :forest departmentवनविभाग