शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेंटेनन्सवर लाखाेंचा खर्च तरीही का खंडित हाेते वीज?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2022 05:00 IST

प्रत्येक गावाला लाेखंडी खांबाद्वारे वीज पुरवठा केला आहे. विजेच्या तारेचा लाेखंडी खांबाशी संपर्क येऊ नये, यासाठी खांबाला चिनी मातीने बनलेले इन्सुलेटर बसविले आहे. या इन्सुलेटरला वीज तार गुंफली जाते. माती विजेची दुर्वाहक असल्यामुळे वीज प्रवाह खांबापर्यंत पाेहाेचत नाही. मात्र काही दिवसानंतर इन्सुलेटर पाऊस पडताच फुटतात. त्यामुळे वीज प्रवाह जमिनीत पाेहाेचून लाईन बंद पडते. हवेमुळे विजेच्या तारांचा एकमेकांशी संपर्क हाेऊन स्पार्किंग हाेते व वीज पुरवठा खंडित हाेतो. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : वीज पुरवठा करणाऱ्या साधनांच्या देखभाल दुरुस्तीचे काम पावसाळ्यापूर्वी आटाेपले जाते. यावर महावितरणचे लाखाे रूपये खर्च हाेतात. तरीही वादळवारा किंवा पाऊस सुरू हाेताच तसेच भर उन्हाळ्यातही वीज पुरवठा अचानक खंडित हाेतो. देखभाल दुरूस्ती केली असतानाही वीज पुरवठा का खंडित हाेतो, असा सहज प्रश्न ग्राहकांना पडताे. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे वीज पुरवठा आपाेआप खंडित हाेत असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. गडचिराेली जिल्ह्यातील वीज लाईन जंगलातून गेली आहे. त्यामुळे पावसाळ्यात विजेची समस्या अतिशय गंभीर हाेते. एकदा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर किमान एक दिवस वीज पुरवठा सुरळीत हाेत नाही. जंगलात विजेचा बिघाड शाेधताना वीज कर्मचाऱ्यांच्याही नाकीनऊ येतात.

लाईट जाण्याची नेमकी कारणे काय?

प्रत्येक गावाला लाेखंडी खांबाद्वारे वीज पुरवठा केला आहे. विजेच्या तारेचा लाेखंडी खांबाशी संपर्क येऊ नये, यासाठी खांबाला चिनी मातीने बनलेले इन्सुलेटर बसविले आहे. या इन्सुलेटरला वीज तार गुंफली जाते. माती विजेची दुर्वाहक असल्यामुळे वीज प्रवाह खांबापर्यंत पाेहाेचत नाही. मात्र काही दिवसानंतर इन्सुलेटर पाऊस पडताच फुटतात. त्यामुळे वीज प्रवाह जमिनीत पाेहाेचून लाईन बंद पडते.हवेमुळे विजेच्या तारांचा एकमेकांशी संपर्क हाेऊन स्पार्किंग हाेते व वीज पुरवठा खंडित हाेतो. वीज खांबावर वीज पडल्यामुळे इन्सुलेटर  फुटतात. उन्हाळ्यात अचानक विजेचा वापर वाढल्याने डीपीवरील फ्युज उडतात व वीज पुरवठा खंडित हाेतो.  विजेचा शाॅक बसल्याची एखादी दुर्घटना घडल्यानंतर वीज पुरवठा खंडित हाेतो. 

लाईट लगेच येऊन का जाते?एखादी दुर्घटना घडताच वीज पुरवठा खंडित हाेते. उपकेंद्रावरील ऑपरेटर पाच मिनिटानंतर पुन्हा वीज पुरवठा सुरू करून बघते. मात्र पुन्हा लाईट बंद पडल्यास वीज लाईनमध्ये काहीतरी बिघाड निर्माण झाला असल्याचा अंदाज येऊन महावितरणचे कर्मचारी कामाला लागतात.

ऑपरेटर वीज पुरवठा खंडित करताे का?पाऊस, वादळवाऱ्याला सुरूवात झाल्यानंतर वीज पुरवठा खंडित हाेते. यावेळी उपकेंद्रातील ऑपरेटर वीज पुरवठा खंडित करते, असा गैरसमज नागरिकांचा आहे. मात्र ऑपरेटर कधीच वीज पुरवठा खंडित करीत नाही. इन्सुलेटर फुटणे, वीज तारा तुटने अशा घटना घडल्यानंतर आपाेआप वीज पुरवठा खंडित हाेते.

   वीज पुरवठा बंद झाला नाही तर.... -    एखाद्या खांबावरील इन्सुलेटर फुटल्यानंतरही वीज पुरवठा सुरूच राहिल्यास हा वीज पुरवठा खांब, सभाेवतालच्या ओल्या परिसरात पसरेल. एवढ्या परिसरात एखादा प्राणी किंवा व्यक्ती गेल्यास त्याला विजेचा धक्का लागून ताे गतप्राण हाेऊ शकतो. त्यामुळे इन्सुलेटर फुटल्याने वीज पुरवठा आपाेआप खंडित हाेईल, अशी सिस्टिम महावितरणकडे आहे. -   एखाद्या व्यक्तीला शाॅक लागला तर लागलीच वीज पुरवठा खंडित हाेतो. त्यामुळे त्याचा प्राण वाचू शकतो. -    वीज पुरवठा खंडित न झाल्यास माेठी जीवितहानी हाेण्याची भीती राहते.

 

टॅग्स :electricityवीज