शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या विद्रुपीकरणाला जबाबदार काेण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:00 IST

शहरात इंदिरा गांधी चाैक, कारगील चाैक, आयटीआय चाैक हे मुख्य चाैक आहेत. शहरात जाहिरातीचे फलक लावता येतात. मात्र, त्यासाठी नगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते. वाहनधारकांना पुढचे दिसण्यास अडचण हाेणार नाही, अशा ठिकाणची जागा नगरपालिका निवडून देते. याचठिकाणी फलक लावणे अपेक्षित आहे. खासगी कंपन्यांमार्फत हे फलक लावता येतात.

दिगांबर जवादेलाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : शहरातील मुख्य चाैकांसह इतर चाैकांमध्ये मिळेल त्या जागेवर जाहिरात तसेच शुभेच्छा देणारे फलक लावले जातात. यामुळे शहराचे विद्रुपीकरण वाढत चालले आहे. नगरपालिका प्रशासन संबंधितांवर कारवाई करत नसल्याने कुठेही फलक लावण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. शहरात इंदिरा गांधी चाैक, कारगील चाैक, आयटीआय चाैक हे मुख्य चाैक आहेत. शहरात जाहिरातीचे फलक लावता येतात. मात्र, त्यासाठी नगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते. वाहनधारकांना पुढचे दिसण्यास अडचण हाेणार नाही, अशा ठिकाणची जागा नगरपालिका निवडून देते. याचठिकाणी फलक लावणे अपेक्षित आहे. खासगी कंपन्यांमार्फत हे फलक लावता येतात. या फलकांच्या माध्यमातून नगरपालिकेला करही मिळतो. हे फलक अधिकृत आहेत, मात्र या फलकांव्यतिरिक्त काही दुकानदार, काेचिंग क्लासेसचे संचालक तसेच राजकारणी व्यक्तींच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे फलक कुठेही लावले जातात. यामुळे रस्त्यावरून वाहन चालविणाऱ्या व्यक्तीला पुढचे दिसत नसल्याने अपघात होतात. तसेच कुठेही फलक लावल्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणातही भर पडते. त्यामुळे अशा फलकांवर कारवाई हाेणे गरजेचे आहे. 

पथदिव्यांच्या खांबांना बॅनर लावण्याचे प्रकार वाढले- एखाद्या राजकीय पुढाऱ्याचा वाढदिवस असल्यास किंवा एखाद्या पदावर नियुक्ती झाल्यास बसस्थानक ते बाजार चाैकापर्यंत पथदिव्यांच्या खांबाना शुभेच्छा देणारे बॅनर लावले जातात. रस्त्याच्या मधाेमध असलेल्या बॅनरमुळे वाहनधारकाला पुढचे दिसण्यास अडथळा हाेते. तसेच वाहनधारकांचे या बॅनरकडे लक्ष गेल्याने अपघात हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे बॅनर अतिशय धाेकादायक आहेत. मात्र, नगर परिषद प्रशासन काेणतीही कारवाई करत नसल्याने असे फलक लावण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. या बॅनरवर कारवाई करण्याची गरज आहे.

नगरसेवकही माेडतात नियमएखाद्या नगरसेवकाचा किंवा राजकीय पदाधिकाऱ्याचा वाढदिवस असल्यास नगरसेवक पथदिव्यांवर शुभेच्छांचे बॅनर लावतात. नगरसेवकच नियम माेडतात.

 

टॅग्स :Banerबाणेर