(बॉक्स)
जबाबदारी नेमकी कोणाची?
यासंदर्भात ‘लोकमत’ने विचारणा केल्यानंतर मुख्याधिकारी ओहोळ यांनी, गटार योजनेच्या कामावर देखरेख करणाऱ्या जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना सांगतो, असे उत्तर दिले. पण ५ दिवस उलटून गेले तरी कोणीही ते वाहून जाणारे पाणी थांबवण्यासाठी आलेले नाही. एकमेकांवर ढकलाढकली करत केवळ टाईमपास करण्याच्या या भूमिकेमध्ये आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले, याचे कोणालाच काही वाटत नाही, ही प्रशासकीय यंत्रणेसाठी चिंतनाची बाब आहे.
(बॉक्स)
जिल्हाधिकारी दखल घेतील का?
जमिनीखाली फुटलेल्या नळाच्या पाईपलाईनचे पाणी जमिनीवर येऊन वाहत असल्याने त्या ठिकाणी चिखल, शेवाळ साचले आहे. भरपूर पाऊस येईल त्यावेळी रस्त्यावरून वाहत येणाऱ्या आणि नालीच्या पाण्याचा दबाव वाढून घाण पाणी त्या लिकेजमधून नळावाटे लोकांच्या घरात जाईल. त्यातून अनेकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. शहरवासीयांना शुद्ध पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपरिषदेची असताना, न.प. प्रशासन नागरिकांची प्रकृती बिघडण्याची वाट पाहत आहे का? असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी आता दखल घेऊन हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.