गडचिराेली : महाराष्ट्र लाेकसेवा आयाेग व रेल्वे भरती मंडळाच्या वतीने भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने दाेन्ही परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे माेठा पेच निर्माण झाला आहे. एकाच दिवशी दाेन्ही परीक्षा असल्याने काेणत्याही एका परीक्षेपासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागणार आहे.
महाराष्ट्र लाेकसेवा आयाेगाच्या वतीने २१ मार्च राेजी रविवारला ऑफलाईन परीक्षा ठेवण्यात आली. एमपीएससीचा पहिला पेपर सकाळी १० ते १२ या वेळेत असून दुसरा पेपर ३ ते ५ या वेळेत आहे.
रेल्वे एनटीपीसीची परीक्षा ऑनलाईन असून सकाळी १०.३० ते १२ या वेळेत पेपर हाेणार आहे. तसेच ३.३० ते ५ या वेळेत रेल्वे भरती प्रक्रियेचा पेपर हाेणार आहे. गडचिराेली जिल्ह्यात जिल्हा परिषद, पाेलीस व वनविभागाच्या भरती प्रक्रियेत उतरून परीक्षेला सामाेरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या माेठी आहे. मात्र या भरती प्रक्रियेतही पेसा कायद्यामुळे मर्यादा आल्याने बिगर आदिवासी विद्यार्थी गेल्या काही वर्षांपासून एमपीएससी व रेल्वे भरती प्रक्रियेच्या परीक्षेकडे वळले आहेत. एमपीएससी साठी ३ हजार परीक्षार्थ्यांची व्यवस्था हाेईल इतके केंद्र गडचिराेली जिल्ह्यात ठेवले जातात. मात्र यावेळी हाेणाऱ्या एमपीएससी परीक्षेत जिल्ह्याच्या विविध भागातून एकूण २ हजार ५२६ विद्यार्थी बसलेले आहेत.
बाॅक्स
रेल्वेसाठी गाठावे लागते नागपूर व चंद्रपूरचे केंद्र
गडचिराेली जिल्ह्यात गडचिराेली शहरात विविध शाळा व महाविद्यालय मिळून एमपीएससी परीक्षेसाठी जवळपास १३ परीक्षा केंद्र ठेवण्यात आले आहेत.
रेल्वे परीक्षेसाठी जिल्ह्यात एकही केंद्र नाही. येथील विद्यार्थी चंद्रपूर व नागपूर शहरात असलेल्या केंद्रावर पाेहाेचून रेल्वे भरतीची परीक्षा देतात. केंद्र नसल्याने विद्यार्थी त्रस्त आहेत.
काेट
दाेन्ही परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी म्हणतात
गडचिराेली येथील अभ्यासिकेमध्ये जाऊन तसेच घरी अभ्यास करून मी गेल्या दाेन वर्षापासून एमपीएससी व रेल्वे भरती प्रक्रियेच्या परीक्षेची तयारी करीत आहे. या दाेन्ही परीक्षेला मी बसलो आहे. मात्र परीक्षा एकाच दिवशी आल्याने अडचण झाली आहे.
कुणाल रामटेके, विद्यार्थी
एमपीएससी व रेल्वेची परीक्षा वेगवेगळ्या दिवशी घेणे आवश्यक हाेते. कारण गडचिराेली जिल्ह्यात रेल्वे परीक्षेचे एकही केंद्र नाही. दाेन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने एकच परीक्षा देता येईल.
संजय काेरामी, विद्यार्थी