शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

काेराेना लसीकरण ठरविणार शाळा कधी सुरू हाेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 05:00 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे वर्षभर शाळा सुरू झाल्या नाहीत. इयत्ता पहिली ते चाैथीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात ...

ठळक मुद्देपहिलीच्या विद्यार्थ्यांनी शाळा बघितलीच नाही; खालच्या वर्गातील विद्यार्थी घरी बसून कंटाळले

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : काेराेना संसर्गाच्या महामारीमुळे वर्षभर शाळा सुरू झाल्या नाहीत. इयत्ता पहिली ते चाैथीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात मुळीच भरले नाही. २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष काेराेनामुळे ऑनलाईन स्वरूपात गेले. आता आगामी २०२१-२२ या शैक्षणिक सत्राचे भवितव्यही काेराेना लसीकरणावरच अवलंबून आहे. काेराेना संसर्गाची पहिली लाट आटाेक्यात आल्यानंतर दिवाळीनंतर दाेन महिन्यांसाठी इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात भरविण्यास सुरुवात झाली. त्यानंतर इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले. दरम्यान, अल्पावधीतच पुन्हा काेराेना संसर्गाची दुसरी लाट आली. परिणामी सुरू झालेले हे वर्ग पुन्हा बंद पडले. सन २०२०-२१ या शैक्षणिक सत्रात इयत्ता पहिलीत प्रवेश घेतलेल्या हजाराे विद्यार्थ्यांनी शाळा वर्षभर पाहिलीच नाही. आता हे विद्यार्थी सरसकट दुसरीत पाेहाेचले आहेत. 

१५ हजार विद्यार्थी थेट दुसरीतn यंदाच्या शैक्षणिक सत्रात गडचिराेली जिल्ह्याच्या सर्व शाळा मिळून ७ हजार ९५४ मुले व ७ हजार ४५४ मुली असे एकूण १५ हजार ४०८ विद्यार्थी शाळेत न जाता थेट इयत्ता दुसरीत पाेहाेचले आहेत. n इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांमध्ये शाळेबाबत प्रचंड उत्सुकता असते. नवीन पुस्तक, नवीन सर्व साहित्य सर्व काही नवीन असल्याने प्रचंड उत्सुकता असते. मात्र, यावर्षी काेराेनाने इयत्ता पहिली ते चाैथीच्या विद्यार्थ्यांना शाळेपर्यंतच पळूच दिले नाही. 

आमच्या शाळेत इयत्ता पाचवी ते सातवीचे वर्ग दाेन महिने चालविण्यात आले. त्यानंतर पुन्हा काेराेनाचा संसर्ग वाढल्याने शासनाच्या आदेशानुसार वर्ग बंद पडले. खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी शाळाच पाहिली नाही. काेराेनाचे संकट दूर हाेऊन आगामी शैक्षणिक सत्रात शाळा व वर्ग सुरळीत चालाव्या, अशी अपेक्षा आहे. - राजेंद्र घुगरे, मुख्याध्यापक, जि. प. शाळा, नगरी. 

काेराेना संकटामुळे यावर्षी जि. प. शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान झाले. ऑनलाईन प्रक्रिया राबविण्यात आली असली तरी त्यात सर्व विद्यार्थी १०० टक्के सहभागी हाेऊ शकले नाहीत. काेराेना संसर्गाची समस्या पूर्णत: नष्ट झाल्यानंतर शाळा प्रत्यक्ष सुरू हाेतील. दरम्यान, आराेग्याच्या दृष्टिकाेनातून काेराेनाचे लसीकरण अतिशय महत्त्वाचे आहे. - हेमलता परसा, शिक्षणाधिकारी (प्राथ.), जि. प. गडचिराेली.

यावर्षी तरी वर्ग भरावे

माझी मुलगी इयत्ता तिसरीत असून यावर्षी चाैथीत गेल्याचे तीच सांगत आहे. काेराेना महामारीच्या समस्येमुळे यावर्षी घरी राहूनच शिक्षकांच्या मार्गदर्शनानुसार गृहपाठ केला. पुढील सत्रात तरी शाळा सुरू व्हाव्या. - पंढरी जुआरे, पालक.

काेराेनामुळे आम्हा विद्यार्थ्यांना वर्षभर शाळेत जाता आले नाही. परिणामी घरी बसून प्रचंड कंटाळा आला. येत्या शैक्षणिक सत्रात तरी शाळेत प्रत्यक्ष बसण्याची संधी मिळावी. तसे झाल्यास आम्ही विद्यार्थी आनंदी राहू. - वैशाली चाैधरी, विद्यार्थिनी.

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या