शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वीज समस्या सुटणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:13 IST

तालुक्यातील अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भागात बाराही महिने वीज समस्या असते. या भागात दररोज विजेचा लपंडाव सुरू असतो.

ठळक मुद्देविद्युत विभागाचे दुर्लक्ष : अहेरी तालुक्यात विजेचा लपंडाव

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : तालुक्यातील अतिसंवेदनशील व नक्षलग्रस्त भागात बाराही महिने वीज समस्या असते. या भागात दररोज विजेचा लपंडाव सुरू असतो. गुड्डीगुडम व राजाराम परिसरात या समस्येचा सामना नागरिक अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र याकडे विद्युत विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी या भागाचा विकासही खुंटला आहे.गुड्डीगुडम व राजाराम भागात मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी मूलभूत समस्या या भागातील नागरिकांना भेडसावत आहेत. प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तथा लोकप्रतिनिधी या भागातील समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करीत असून दिवसेंदिवस या समस्या वाढत चालल्यात आहेत. या भागातील समस्या अद्यापही न सुटल्याने दळणवळणाचीही समस्या निर्माण झाली आहे. गुड्डीगुडम व राजाराम परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून जिमलगट्टा वीज उपकेंद्रातून वीज पुरवठा केला जातो. परंतु हा सर्व परिसर घनदाट जंगलाने व्यापला असल्याने कोणत्याही किरकोळ कारणानेही दिवस-रात्र वीज पुरवठा खंडित राहतो. वीज कर्मचारी मुख्यालयी न राहता, आलापल्ली, अहेरी येथून ये-जा करतात. त्यामुळे एकदा खंडित झालेला वीज पुरवठा दोन ते तीन दिवसापर्यंत सुरळीत होत नाही. अनेकदा चार ते आठ दिवस वीज पुरवठा खंडित असते. विजेसंबंधी कामे करण्यासाठी नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे या भागातील समस्या कोण सोडविणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील दोन वर्षांपूर्वी विद्युत शाखा कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देऊन सर्वच नागरिकांनी ग्राम पंचायतीमार्फत ठराव पारीत करून जिमलगट्टा येथून आलेली वीज जोडणी नंदीगाव परिसरातून देण्याची मागणी केली होती. परंतु यावेळी अधिकाºयांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले, मात्र या समस्येकडे दुर्लक्ष झाले.स्थायी लाईनमन नियुक्त करागुड्डीगुडम, राजाराम परिसरातील १५ ते २० गावे सांभाळण्याकरिता वीज वितरण विभागाच्या वतीने अत्यल्प कर्मचाºयाची नियुक्ती करण्यात आली आहे. अत्यल्प कर्मचाºयांवरच संपूर्ण परिसराचा भार सांभाळला जात आहे. शिवाय मागील अनेक वर्षांपासून उर्वरित कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. त्यामुळे येथे स्थायी लाईनमन नियुक्त करण्याची मागणी होत आहे.