शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

४० हजारांची लाच घेताना वनपाल एसीबीच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 23:03 IST

वन कायद्यांतर्गत लाकूड चोरीच्या गुन्ह्यात अटक करताना सवलत देण्यासाठी आणि जप्त केलेली मोटारसायकल सोडून देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना वनपाल रमेश पन्नू बलैया (३२) याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई गुरूवारी (दि.११) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) गडचिरोली पथकाने केली.

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (गडचिरोली) : वन कायद्यांतर्गत लाकूड चोरीच्या गुन्ह्यात अटक करताना सवलत देण्यासाठी आणि जप्त केलेली मोटारसायकल सोडून देण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच घेताना वनपाल रमेश पन्नू बलैया (३२) याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई गुरूवारी (दि.११) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) गडचिरोली पथकाने केली.आरोपी वनपाल चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा (कं) उपक्षेत्रातील रेंगेवाही येथे कार्यरत आहे. प्राप्त माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारकर्त्याच्या भावावर वनपाल रमेश बलैया याने लाकूड चोरीचा गुन्हा दाखल केला होता. तसेच त्याची मोटारसायकलही जप्त केली होती. दरम्यान अटक करताना सवलत द्यावी आणि मोटारसायकल सोडून द्यावी यासाठी वनपाल बलैया याने १ लाख २० हजार रुपयांची मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता ५० हजार रुपये देण्यास सांगितले. दरम्यान तक्रारकर्त्याने गडचिरोलीतील एसीबी कार्यालय गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार गुरूवारी मार्कंडा (कं) क्षेत्राच्या जंगल परिसरात सापळा लावण्यात आला. दरम्यान तडजोडीअंती ४० हजार रुपये तक्रारकर्त्याकडून पंचसाक्षीदारांसमक्ष स्वीकारताना वनपाल बलैया याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्याविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम (सुधारित) २०१८ अन्वये आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई एसीबी नागपूरचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक राजेश दुद्दलवार, राजेंद्र नागरे, उपअधीक्षक विजय माहुलकर, डी.एम.घुगे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली एसीबी पथकाचे निरीक्षक रवी राजुलवार, सहा.फौजदार मोरेश्वर लाकडे, हवालदार विठोबा साखरे, सत्यम लोहंबरे, नायक रविंद्र कत्रोजवार, सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, कॉन्स्टेबल देवेंद्र लोनबले, गणेश वासेकर, महेश कुकुडकार, तुळशीदास नवघरे, घनश्याम वडेट्टीवआर, सोनल आत्राम, सोनी तवाडे यांनी केली.