शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याअभावी १०८ रूग्णवाहिकेचे चाक थांबलेलेच

By admin | Updated: August 9, 2015 01:28 IST

राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात रस्ते निर्मितीकडे राज्य व केंद्र सरकारचे दुर्लक्ष ....

नेलगुंडा परिसरातील २५ गावांना रूग्णवाहिकेचा लाभ नाहीरमेश मारगोनवार  भामरागडराज्यपालांनी दत्तक घेतलेल्या महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात रस्ते निर्मितीकडे राज्य व केंद्र सरकारचे दुर्लक्ष झाल्याने या तालुक्यात आरोग्य विभागाला देण्यात आलेल्या १०८ रूग्णवाहिकेचा उपयोग होतच नाही, असे चित्र आहे. त्यामुळे अनेक दुर्गम गावातून आजही खाद्यांवर व खाटेवर रूग्ण दवाखान्यापर्यंत आणले जातात. भामरागड तालुका मुख्यालयापासून २२ किमी अंतरावर असलेला नेलगुंडा परिसर हा पामुलगौतम नदीच्या पलिकडे आहे. नदी ओलांडल्यानंतर धोडराज फाट्यापासून एक भाग लाहेरी व दुसरा भाग नेलगुंडा. या परिसरात गोंगवाडा, परयनार, इतलवाडा, बुसेवाडा, बोडंगे, गोटपाडी, पेनगुडा, इरपनार, कुचेर, दरबा, जुव्वी, गोलगुडा, जारेगुडा, भटपार, कवंडे आदी २५ गावांचा समावेश आहे. या मार्गावर मोठे नाले असल्याने पावसाळ्यात दळणवळणाच्या साधनाचा अभाव आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना आरोग्य सेवेसाठी भामरागडला येण्याकरिता रूग्णांना खाटेवर बांधून आणल्याशिवाय पर्याय नाही. शासनाकडून १०८ टोल फ्री रूग्णवाहिका वाहन उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र भामरागडपासून अहेरी उपजिल्हा रूग्णालय किंवा गडचिरोली रूग्णालयापर्यंत या वाहनाची सुविधा उपलब्ध होत आहे. तालुक्याच्या दुर्गम भागामध्ये रस्त्याअभावी रूग्णांना १०८ टोल फ्री रूग्णवाहिकेचा उपयोग होत नाही. बाळंत महिलेलाही सोसाव्या लागते यातनाअनेकदा बाळंतपणाच्या गंभीर महिलेला ग्रामीण रूग्णालयात पामुलगौतम नदी ओलांडून खाटेवर आणावे लागते. येथे डॉक्टर नसले तर हेमलकसाच्या रूग्णालयात न्यावे लागते. नेलगुंडा परिसरातील लोकांसाठी हा अनुभव आता नवा राहिलेला नाही. डॉक्टरांच्या रिक्त पदामुळे शवविच्छेदनासाठी जावे लागते अहेरीभामरागड येथे ग्रामीण रूग्णालय आहे. परंतु या ग्रामीण रूग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची पद रिक्त आहे. कधीकधी वेळेवर एकच डॉक्टर उपस्थित राहतात. ते सुटीवर गेले तर जिवंत असलेल्या रूग्णावरही उपचार न झाल्याने मरणाची पाळी येते तर अनेकदा शवविच्छेदनासाठी नातलगांना शव घेऊन अहेरी उपजिल्हा रूग्णालय गाठावे लागते.